parag agrawal : मुंबई ते ट्विटर... ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांचा असा आहे प्रवास | पुढारी

parag agrawal : मुंबई ते ट्विटर... ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांचा असा आहे प्रवास

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात लोकप्रिय असणाऱ्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने मोठा बदल केला आहे. कंपनीचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी एक भारतीय वंशज असलेले अमेरिकन पराग अग्रवाल ( parag agrawal ) हे विराजमान होणार आहे. पराग अग्रवाल यांचा ट्विटर पर्यंतचा प्रवास कसा होता. ते आयआयटी मुंबई ते ट्विटरचे सीईओ हा त्‍यांचा प्रवास आपण जाणून घेऊया.

parag agrawal : मुंबई आयआयटी ते ट्विटरचा प्रवास

२०११ मध्‍ये पराग अग्रवाल यांचे आणि ट्विटरचे २०११ मध्ये नाते बनले. याआधी त्यांनी याहू आणि मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये काम केले हाेते. अग्रवाल हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे.

ट्विटरवर जाहिरात अभियंता म्हणून रूजू झालेल्या अग्रवाल यांना ऑक्टोबर २०१७ मध्ये कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) बनवण्यात आले. कंपनीचे तांत्रिक धोरण ते मोठ्या शिताफीने हाताळत होते. PeopleAI च्या मते, परागची यांची एकूण संपत्ती १.५२ मिलियन डॉलर इतकी आहे.

यासाठी जॅक डोर्सी यांनी सोडले ट्विटरचे सीईओपद

जॅक डोर्सी यांना ट्विटरचे सीईओ पद सोडावे लागले कारण ते स्क्वेअर या कंपनीचे सीईओदेखील आहेत. डोर्सी यांनी ‘स्क्वेअर’ची स्थापना केली. अशा परिस्थितीत जॅक डोर्सी एकाच वेळी दोन कंपन्यांचे सीईओ असल्याबद्दल काही बड्या गुंतवणूकदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. ते दोन्ही कंपन्यांचे प्रभावी नेतृत्व करू शकेल का, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जॅक डोर्सी यांनी १५ मार्च २००६ रोजी ट्विटरची स्थापना केली आणि त्यानंतर २००८ पर्यंत कंपनीचे सीईओ झाले हाेते.

जॅक डोर्सी यांच्याकडून पराग अग्रवाल यांचे कौतुक

सीईओपदाचा राजीनामा देताना जॅक डोर्सी यांनी पराग अग्रवाल यांचे कौतुक केले आहे. सीईओ म्हणून पराग यांच्यावर माझा विश्वास आहे. गेल्या १० वर्षात त्यांनी केलेले काम अभूतपूर्व आहे. त्याला कंपनी आणि त्याच्या गरजा चांगल्या प्रकारे समजत असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात असल्‍याचे डोर्सी यांनी म्‍हटलं आहे.

अग्रवाल यांनी पराग अग्रवाल यांच्‍या नियुक्तीनंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोक आज मीडियावर वेगवेगळे मत दर्शवत असतात.नेटकऱ्यांना आमच्या आणि ट्विटरच्या भविष्याची काळजी असल्याने आम्हाला त्यांची नेहमी साथ मिळणार आहे. .भविष्यात ट्विटरची पूर्ण क्षमता जगाला दाखवणार असल्याचा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचलं का?

Back to top button