पुढारी तुमच आजच राशिभविष्य काय सांगतं

तुमच आजच राशिभविष्य काय सांगतं

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष – प्रवासाचे योग संभवतात. सौख्यकारक घटना घडतील. सत्संगामधे दिवस जाईल. प्रसन्नता लाभेल.कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ – नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. व्यापारी व नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन – कामात एकाग्रता आवश्यक आहे. कामाचे नियोजन करा. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. मनाविरुद्ध गोष्टी घडतील. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
कर्क
कर्क – आत्मविश्वासाने काम करणे महत्त्वाचे आहे. व्यवहारात सावधानता आवश्यक. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक भीती निर्माण होईल.

सिंह

सिंह – लोकानुकूलता लाभेल. कामाचे कौतुक होईल. आप्तेष्टांच्या सहकार्याने कार्यसिद्धी होईल. धनप्राप्तीचे योग संभवतात.
राशिभविष्य
कन्या
कन्या – वादग्रस्त विधानामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. अवास्तव खर्चावर नियंत्रण ठेवा. आपापसातील मतभेद सामंजस्याने सोडवावे लागतील.
राशिभविष्य
तुळ
तूळ – आनंददायी घटना घडतील. कार्यनिश्चिती होईल. आदर-सत्कार होतील. चांगल्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. आप्तस्वकीयांबरोबर आनंदात दिवस जाईल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – गैरसमजातून वादविवादचे प्रसंग उद्भवतील. आळस अपयशाकडे घेऊन जाईल. कार्यतत्परता आवश्यक आहे. कर्जदार तगादा लावतील. नियोजन आवश्यक आहे.
राशिभविष्य
धनु
धनु – विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. प्रेम-प्रकरणांत यश मिळेल. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक आणि आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर
मकर – अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. पदोन्नतीचे योग संभवतात. कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील. वाद-विवादात यश मिळेल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – अकारण भीती बाळगू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. थकवा, अशक्तपणा जाणवेल. योग साधनेची गरज. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मीन
मीन – मानसिकता बिघडवणार्‍या घटना घडतील. अस्वस्थता राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस आहे. आरोप-प्रत्यारोप होतील.

राशिभविष्य

Back to top button