राशिभविष्य (दि. २७ नोव्हेंबर २०२१) - पुढारी

राशिभविष्य (दि. २७ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – कामांत अडचणी येतील. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. प्रत्युत्तर करू नका. वाहने सावकाश चालवा. अचानक खर्च उभे राहतील. अनावश्यक भीतीमुळे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. धनलाभाचे योग. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचा योग. मैत्रीला जागाल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. आत्मचिंतनाची गरज आहे. वस्तू हरवण्याची शक्यता.

सिंह

 

 

 

 

सिंह- मेजवानीचा लाभ घ्याल. भाग्यकारक घटनांचा दिवस. नव्या मित्रांची ओळख होईल. शुभवार्ता कानावर येईल. अलंकार, वस्त्रांची खरेदी कराल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – समज-गैरसमजातून मनःस्ताप होण्याची शक्यता. कलह टाळावा. कामांत अडचणी येतील. क्रियाशील राहा.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ -प्रयत्नांना यश मिळेल. आनंददायी घटनांचा दिवस. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणी जाग्या होतील. एकंदर लाभदायक असा दिवस असेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक – सातत्य, ध्यास यामुळे ठरवलेल्या कामांत यश मिळेल. खर्‍या अर्थाने इच्छापूर्तीचा दिवस असेल. प्रामाणिकपणामुळे अधिकारांत वाढ होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

धनु – मानहानीचे प्रसंग येतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. जुने आजार उद्भवतील. अनावश्यक खर्च होतील. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – कितीही प्रयत्न केले, तरी अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस असेल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – मनासारख्या घटना घडतील. सौख्यकारक घटना घडतील. जोडीदाराची साथ लाभेल. सज्जनांच्या सहवासाने कार्यसिद्धी होईल. मान-सन्मान होतील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – प्रसन्‍नता प्राप्त होईल. धनलाभाचे योग. शत्रूंवर मात कराल. सौख्यकारक घटनांचा दिवस.

Back to top button