Foot Pain | पायदुखीने त्रस्त आहात? घरच्या घरी करा ‘हे’ उपाय

Foot Pain
Foot Pain
Published on
Updated on

पायदुखीचा त्रास सर्वच वयोगटातील लोकांना होतो. पायदुखीची तीव्रता ही विविध प्रमाणात असू शकते. अधिक वेदना होत असल्यास अनेकदा त्या सहन करण्याच्या पलीकडे जातात. या व्याधीवर आपल्याला काही घरगुती उपायांद्वारे उपचार करता येतात. ( Foot Pain )

संबंधित बातम्या 

वेदनेची तीव्रता अधिक असेल तर आपल्या हालचालींवर बंधणे येतात. पाय दुखत असल्यामुळे अशक्तपणा येतो, मरगळून जायला होते. या व्याधीवर वेळच्या वेळी उपाचर करणे गरजेचे असते. पायदुखी होण्याची कारणे व्यक्तीनुरूप वेगवेगळी असतात. अनेकदा पायात गोळे आल्यामुळे पाय दुखू लागतात. स्नायू आखडल्यामुळे तसेच स्नायूंवर अतिरिक्त ताण पडल्यामुळे, त्याबरोबरच शरीराला काही पौष्टिक घटकांची कमतरता भासू लागल्याने पाय दुखू लागतात. याखेरीज पाय दुखण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डीहायड्रेशन.

डीहायड्रेशनचा परिणाम पाय दुखण्यात होत असतो. एकाच स्थितीत बर्‍याच वेळ उभे राहिल्याने पायदुखी होते. आपल्याला यापैकी कोणत्या कारणामुळे पाय दुखतो आहे, हे डॉक्टरांकडून जाणून घेतले पाहिजे. त्यानुसार या व्याधीवर आपल्याला उपचार करता येतात; मात्र किरकोळ उपचार करून त्याकडे दुर्लक्ष करू नका. पाय दुखत असतील तर ते मधुमेह, सांधेदुखी, गाऊट यासारख्या आजारांचे लक्षण असू शकते.

तसेच ज्यांना संधिवाताचा त्रास आहे अशा व्यक्तींचेही पाय दुखत असतात. वेदनेची तीव्रता अधिक नसेल तर काही दिवसांत पाय दुखणे थांबते; मात्र खूप दिवस पाय दुखणे चालूच राहिले तर त्या वेदना अनेकांना सहन करणे अवघड जाते. वेदनेची तीव्रता अधिक असेल तर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. या व्याधीवर घरच्या घरी कोणत्या मार्गाने उपचार करता येतात हे पाहू.

दुखणार्‍या पायावर बर्फाने मसाज करणे हा चांगला उपाय ठरू शकतो. त्याकरिता एका टॉवेलमध्ये बर्फाचे तुकडे घ्या आणि पायाचा जो भाग दुखत आहे त्यावर हा टॉवेल दहा ते पंधरा मिनिटे फिरवा. असे करत असताना पाय हलवत राहा. दिवसातून चार-पाच वेळा बर्फाने पायाला शेक दिल्यास पायातील आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

सैंधव मिठामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याचा फायदा या वेदनेची तीव्रता कमी होण्यास होतो.  ( Foot Pain )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news