राशिभविष्य (दि. २२ नोव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. २२ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष – साहसाने कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. कलागुणांना वाव मिळेल. जवळच्या लोकांची मदत मोलाची ठरेल. भावंडांबरोबरचे वाद मिटतील.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ – कौटुंबिक कलह टाळावा. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता आवश्यक आहे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. विनाकारण वेळ वाया जाईल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन – अनपेक्षितपणे लाभ होतील. स्वभावात सकारात्मक बदल होतील. प्रसन्नता लाभेल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल. गुंतवणूक करण्यास योग्य दिवस.
राशिभविष्य
कर्क

कर्क – संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
सिंह

सिंह – अथक प्रयत्नांना यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. नव्या व्यावसायिक धोरणांमुळे उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.
राशिभविष्य
कन्या

कन्या – कौतुकास्पद कार्य कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील, आत्मविश्वास वाढेल. लोककार्यात सहभाग घ्याल.
राशिभविष्य
तुळ
तूळ – आळस व नियोजन नसल्यामुळे कामांत अडचणी येतील. आत्मविश्वासाचा अभाव राहील. धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हाल. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक – प्रतिक्रिया देऊ नका. सावधपणे पावले उचलावीत. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. उष्णतेचे विकार होण्याची संभावना संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
धनु

धनु – व्यवसाय निमित्ताने प्रवासाचे योग संभवतात. भागिदारीमध्ये लाभ होईल. कौटुंबिक सहलीचा योग. चर्चासत्रातून मोठे काम मिळेल.
राशिभविष्य
मकर

मकर – शत्रूंवर मात कराल. अनपेक्षित यश मिळण्याचे योग. सहकार्याने कामे मार्गी लागतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्साहवर्धक वातावरण राहील.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ – संततीबाबत चिंता निर्माण होईल, विद्यार्थी मित्रांना एकाग्रता आवश्यक आहे, लॉटरी व सट्टा यात नुकसान होण्याची शक्यता आहे, सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील.
राशिभविष्य
मीन

मीन – वास्तुविषयक कामे लांबणीवर जातील. वादविवाद टाळावेत. आत्मचिंतनाची गरज आहे. प्रवासात मनःस्ताप होण्याची शक्यता. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.

राशिभविष्य

Back to top button