clinical depression : क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? (भाग-१) | पुढारी

clinical depression : क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? (भाग-१)

डाॅ. भूषण अंबाडकर, न्युरो सायकॅट्रिस्ट

रोजच्या जगण्यात डिप्रेशन (clinical depression) हा शब्द आपण सहजपणे वापरतो. फोन चोरीला जाणं, शेअर मार्केटमध्ये लाॅस होणं किंवा घरात दुःखद घटना घडणं या गोष्टींमुळेही व्यक्तीला उदास वाटायला लागतं, लोक याला डिप्रेशन म्हणतात. पण, उदास वाटणं म्हणजे डिप्रेशन नव्हे. क्लिनिकल डिप्रेशनची जागतिक आरोग्य संघटनेनं याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. त्यामध्ये डिप्रेशन असण्यासाठी संबंधित व्यक्ती किमान १५ दिवस डिप्रेस्ड असावी लागते. त्याचा परिणाम त्याच्या रोजच्या वावरण्यावर होत राहतो.

क्लिनिकल डिप्रेशनमुळे मेंदूत कोणते बदल होतात?

मेंदूमध्ये डोपामाईन, सेरेटोनीन, एन्डाॅर्फिन, अशी रसायनं मेंदूत असतात आणि ती मनाचा समतोल बनवून ठेवतात. या रसायनांमुळे आपल्या मनाची हलचाल होते. आनंद होणं, दुःख होणं, राग येणं, उदास वाटणं, अशा अवस्था याच रसायनांमुळे होत राहतात. माणसाला जेव्हा उदास वाटतं तेव्हा व्यक्तीच्या मेंदूत सेरेटोनीन रसायनाची थेरी सुरू होते. साधारण व्यक्तीच्या मेंदूत त्यातून लगेच बाहेर पडतो. पण, पण, डिप्रेशन असणाऱ्या व्यक्ती मात्र सेरेटोनीन रसायनच्या थेरीत राहतो. ती अवस्था दोन आठवडे किंवा त्याहून जास्त असते. मेंदूतील रसायनांचं रेग्युलेशन असंतुलीत व्हायला लागतं.

क्लिनिकल डिप्रेशनची कारणं

अनुवंशिकता : जसं मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला अनुवंशिकतेने आजार होतो, तसंच क्लिनिकल डिप्रेशनमध्ये असतं. पुर्वजांमध्ये सेरेटोनीन रसायनांच्या असंतुलीतपणाचा आजार असेल, तर अनुवंशिकतेने पुढे सरकत असतो.

कोवळं मन : १८-२० वयोगडातील व्यक्तीचं मन खूपच संवेदनशील आणि भावनाशिल असतं. अशा वयात एखादी घटना घडली की, त्याच्या मनावर मोठा आघात होतो आणि ती व्यक्ती डिप्रेशनची शिकार होते.

शारीरिक आजार : थायराॅड असणाऱ्या ३० टक्के आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये क्लिनिकल डिप्रेशन होण्याची शक्यता असते. मधुमेहमुळेही शरीरावर ताण येतो आणि त्याचा परिणाम मनावर होतो. मणक्याचा त्रासामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते.

clinical depression

क्लिनिकल डिप्रेशनची लक्षणं…

असहायता : यामध्ये संबंधित व्यक्तीला असं वाटतं की, मला या अडचणीतून कोणीच मदत करू शकत नाही.

कामहिनता : मी कुठलंच काम करण्याच्या योग्यतेचा नाही, असं त्या व्यक्तीला वाटतं. माझ्यात क्षमता नाहीत आणि मी काहीच करू शकत नाही, असं वाटतं.

आशाहिनता : माझं भविष्य अंधःकारात आहे आणि उद्यादेखील माझ्या आयुष्यात काही बरं होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात कठीण परिश्रम हे आज, उद्याही राहणार आहेत, अशी क्लिनिकल डिप्रशची लक्षणं जाणवतात.

टिपिकल आणि अटिपिकल डिप्रेशन : त्याचबरोबर दैनंदिन काम रस नसणे, आवडणाऱ्या गोष्टींतील रुची निघून जाणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, झोप न लागणे, पण, टिपिकल डिप्रेशन असं म्हणतात. पण, याउलट भूक जास्त लागणे आणि वजनही जास्त वाढणे किंवा जास्तीत जास्त झोप लागणे, अशीही लक्षण जाणवतात. त्याला अटिपिकल डिप्रेशन असंही म्हणतात. यात उपचारांची पद्धत संपूर्णपणे बदलते.

मनाची अवस्था : मनावरचा ताबा सुटून अनाठायी राग येणे, ऊर्जा कमी होणे, प्रत्येक कामात कंटाळा येणे, उत्साह कमी होणे, अशीही लक्षणं क्लिनिकल डिप्रेशनमध्ये सर्रास दिसून येतात.

क्लिनिकल डिप्रेशनमध्ये (clinical depression) संबंधित व्यक्तीचं रोजचं वागणं, वावरणं, परिणाम आणि त्याच्यावरील नेमकी उपचार पद्धती काय… याची माहिती सविस्तर पुढील लेखात जाणून घेऊ…

क्रमश:

हे वाचलंत का? 

Back to top button