OLA Electric : ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स क्वालिटी हेडचा तडकाफडकी राजीनामा | पुढारी

OLA Electric : ओला इलेक्ट्रिक स्कुटर्स क्वालिटी हेडचा तडकाफडकी राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क

ओला इलेक्ट्रीक स्कूटरने (OLA Electric) मागच्या दोन महिन्यांपासून लोकांना भुरळ घातली आहे. ओलाची स्कूटर बाजारात येण्यापूर्वी कोट्यवधी लोकांनी बुकिंग केले होते. परंतु ओलाच्या इलेक्ट्रीक स्कुटर्स बाजारात येण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. ृ

ओलाकडून ग्राहकांना दिलेल्या वेळेत डिलीव्हरी न दिल्याने कंपनीचे अपयश समोर आले आहे. दरम्यान ओलाच्या क्वालिटी हेडने राजीनामा दिल्याने मोठा धक्का मानला जात आहे.

OLA Electric : एक वर्षात दिला राजीनामा

ओलाचे क्वालिटी हेड जोसेफ थॉमस मागच्या वर्षी २०२० ला कंपनीत काम सुरू केले होते. अशी महिती कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. ग्राहकांना आदीच डिलीव्हरी देण्यास उशीर झाला आहे अशातच ओलाच्या क्वालिटी हेडने राजीनामा दिल्याने ओलाच्या कार्यपद्धतीवर चर्चांना उधाण आले आहे.

थॉमस यांनी रेनो इंडियामधून ओलामध्ये जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी गेली ११ वर्षे पार्ट प्रोग्रॅम, मॅनेजमेंट आणि कार्पोरेट क्वालिटी हेड म्हणून काम केले होते. त्यापूर्वी ते ९ वर्षे फोर्ड मोटर्समध्ये काम पाहत होते.

ओलाकडून अद्यापही खुलासा नाही

ओलाने थॉमस यांच्या राजीनाम्याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ओला सुरक्षा आणि क्वालिटी विभागासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शोधात असल्याचे समजते. थॉमस जाण्याआधी ओलाला ही भरती करायची आहे. दरम्यान एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

ओला इलेक्ट्रीक ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना स्कूटरची डिलिव्हरी करण्यास सुरवात करणार होती.

परंतू, ओलाला यात अपयश आले आहे. नोव्हेंबरची मुदत देऊन आता डिसेंबरपासून डिलिव्हरी सुरु करणार असल्याचे कंपनी सांगत आहे.

यामुळे डिलिव्हरी जवळपास दोन महिन्यांनी पुढे गेली आहे. पहिल्या टप्प्यात डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत डिलिव्हरी करण्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने १२०० कोटींच्या स्कूटर विकल्या गेल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ओलाने स्कूटरची टेस्ट राईड सुरु केली आहे.

Back to top button