राशिभविष्य (दि. १२ नोव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. १२ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : उत्साहाने कामाला सुरुवात कराल, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, लाभदायक दिवस, प्रवासाचे योग संभवतात, आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : प्रसन्‍नता लाभेल, प्रयत्नांना यश मिळेल, पदोन्‍नती होईल, गृहसौख्य उत्तम राहील. कौतुकास्पद कार्य होईल, मान-सन्मान होतील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : आहार-विहाराचे नियम पाळण्याची गरज, प्रतिष्ठा पणाला लागेल, अनावश्यक खर्च होईल, व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे, कामांमध्ये अडचणी येतील.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे खचून जाऊ नका, आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे, आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस, वाद-विवादापासून दूर राहा.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

सिंह : प्रलंबित कामे पूर्ण होतील, मान-सन्मान होतील, सज्जनांचा सहवास लाभेल, प्रवासाचे योग, कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल, व्यावसायिक प्रगती होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस, चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल, शत्रूंवर विजय प्राप्‍त कराल, धनप्राप्‍ती होईल, पदोन्‍नतीचे योग, संधीचे सोने कराल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

तूळ : निर्णय घेताना सावधानता न बाळगल्याने परिणामांना सामोरे जावे लागेल, वादविवादापासून दूर राहा, कामांचे नियोजन करा, खर्चावर नियंत्रण ठेवा.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक : नकारात्मक विचार अनावश्यक भीती निर्माण करतील, कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, गुंतवणूक नको, वाहने सावकाश चालवा, संतुलन महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : जवळच्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील, आर्थिक प्रगती होईल, खरेदीचे योग संभवतात, प्रयत्नांना यश मिळेल, कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : लोकांच्या निंदेकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा, वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, वस्तू सांभाळून ठेवा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : मनासारख्या घटना घडतील, सुवार्ता ऐकायला मिळेल, प्रसन्‍नता लाभेल, आत्मविश्‍वास वाढेल यशाकडे वाटचाल कराल, मनपसंद खरेदीचा दिवस.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन : उत्साह आवश्यक आहे, आळस सोडा, स्वावलंबन आवश्यक आहे, कामांचे नियोजन करा, स्मृती-रंजनात दिवस जाईल.

Back to top button