dybbuk : डिब्बूक हे नाव कधी ऐकलंय का? 'या' गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील - पुढारी

dybbuk : डिब्बूक हे नाव कधी ऐकलंय का? 'या' गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील

पुढारी ऑनलाईन

डिब्बूक हे नाव तुम्ही कधी ऐकलंय का? काय आहे भयानक डिब्बूक? आता याचं नावावर हिंदी चित्रपट येतोय. dybbuk असे चित्रपटाचे नाव असून हा हॉररपट आहे. इमरान हाशमी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. स्वत: इमरान dybbuk विषयी म्हणतो की, मी भूतांमध्ये विश्वास करतो आणि हॉरर चित्रपट मला खूप आवडतात. या चित्रपटाची कहाणी माझ्या मागील हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. या चित्रपटामध्ये मागील चित्रपटांच्या तुलनेत दहापट भीती वाढणार आहे. डिब्बूक २९ ऑक्टोबरला ओटीटी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

डिब्बूकचे दिग्दर्शन जय करताहेत. त्यांनी (Jewish Mythology) ज्यू आख्यायिकेला भारतीय संस्कृतीत मिळवून चित्रपटाची कहाणी रचली आहे.

काय आहे भयानक डिब्बूक?

डिब्बूकच्या अनेक कहाण्या ज्यू साहित्यामध्ये ऐकायला मिळतात. dybbuk किंवा त्यास dibbuk असंही म्हटलं जातं. डिब्बूक एका दुष्ट आत्मा आहे. मानवी शरिरात आवास करणारी आत्मा असं त्यास सोप्या शब्दात म्हणता येईल. ते पूर्वीच्या पापांमुळे जिवंत व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून भटकत असतात.

16व्या-17व्या शतकातील पूर्व युरोपमध्ये अशा आत्म्यांवर विश्वास प्रचलित होता. अनेकदा चिंताग्रस्त किंवा मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना चमत्कारीक काम करणाऱ्या व्यक्तींकडे नेले जात असे. तो एकटाच, भूतबाधा झालेल्या माणसाच्या शरीरातून डिब्बुकला बाहेर काढू शकत असे. मानले जात असे.

संग्रहित फोटो

कोण आहे डिब्बूक?

हिब्रूमध्ये डिब्बूकचा “चिटकणे” असा अर्थ असून तो मृत दुष्ट व्यक्तीचा आत्मा आहे. तो आपल्या इच्छा, भविष्य पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या शरीरात जाऊन ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो.

याचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख बेरोजिट बुकमध्ये केला गेला. याची तुलना इस्लाममध्ये एक जीन किंवा कॅथोलिक धर्मात किंवा रुढीवादीमध्ये एक राक्षसाशी केली जाते.

डिब्बूक अस्तित्वात आहे?

वेगवेगळ्या शतकांदरम्यान नोंदवलेल्या प्रकरणांमधून डिब्बूक अस्तित्वात आहे, असं म्हटलं गेलंय. असंही म्हटलं जात की, नववधूमध्ये ही दृष्ट आत्मा वास करते. मनोचिकित्सक हे मानसिक विकार असल्याचे म्हणतात.

डिब्बूकची हकालपट्टी

डिब्बूक एक शक्तीशाली राक्षस आहे. १० खूप मोठे भक्त, पुरुष सर्वजण रात्री मेणबत्त्या पेटवतात आणि प्रार्थना करतात. जर सकाळी आत्म्याचं स्वप्न पडलं तर डिब्बूकची हकालपट्टी झाल्याचे संकेत असतं. कधीकधी असा विधी एका रात्रीपेक्षा जास्त काळ चालतो. आणि त्यावेळी अनेक पुजारींची उपस्थिती आवश्यक असते.

Back to top button