राशिभविष्य (दि. २५ ऑक्टोबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. २५ ऑक्टोबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – सामंजस्याने आपापसातील प्रश्‍न मिटतील. कलेला वाव मिळेल. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी, ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न कराल. आत्मविश्‍वास वाढेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – स्वतःसाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. दंतरोग होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

मिथुन – आध्यात्मिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. आत्मचिंतन होईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल.

राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. कर्ज घेताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – वक्‍तशीरपणा व दिलेला शब्द पाळल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींच्या सहवासाने प्रसन्‍नता प्राप्त होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – वरिष्ठांच्या मदतीने कौटुंबिक समस्या सुटतील. नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल. नियोजनबद्धतेमुळे कार्यसिद्धी होईल .

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

तुळ – जुने आजार उद्भवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. कुठेही सही करताना सतर्कता महत्त्वाची आहे.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

वृश्‍चिक – परावलंबी स्वभावामुळे फसवणुकीची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वादविवादापासून दूर राहणे फायद्याचे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – अनेक दिवसांपासून चालू असलेल्या कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. थोरा-मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – आरोग्यवर्धक व ध्यानधारणेमध्ये दिवस जाईल. केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. पगारवाढ व बढतीची शक्यता आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील. निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. प्रतिष्ठा पणाला लागेल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन – अनावश्यक भीती निर्माण होईल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील, पोटासंबंधित तक्रारी संभवतात

Back to top button