राशिभविष्य (दि. १४ ऑक्टोंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. १४ ऑक्टोंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष – सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान होतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ – सरकारी कामांत अडचणी येतील. मनःस्ताप होईल. आरोग्याचा तक्रारी संभवतात. कृत कर्माचा पश्चाताप होईल. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन – अविचाराने वागू नका. संयम आवश्यक. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
कर्क
कर्क – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. योग्य पद्धतीने संवाद साधाल. प्रवासाचे योग. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. स्मृतिरंजनात दिवस जाईल.
राशिभविष्य
सिंह
सिंह – सहकारी आपल्याशी चुकीचे वागतील; पण आपण चांगुलपणाने मात कराल. आर्थिक प्रश्न सुटतील. प्रलंबित कामांना गती मिळेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या – वादविवाद टाळा. प्रेम प्रकरणांत अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. व्यवहारात फसवणुकीची शक्यता.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ – घराविषयीच्या कामांत अडचणी येतील. संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे.आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळा.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – लेखक, कलाकारांना वाव. साहसी कामे कराल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.
राशिभविष्य
धनु
धनु – दंतरोग उद्भवतील. सामंजस्याने वागा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक समस्याना तोंड द्यावे लागेल.
राशिभविष्य
मकर
मकर – मनासारख्या आनंददायी घटना घडतील. आप्तेष्टांच्या भेटीचे योग. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. खरेदीचे योग.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – कोर्टकचेरीच्या कामांत अडचणी येतील. व्यवहारात सावधानता बाळगा. कर्जदार तगादा लावतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्याला महत्त्व द्या.
राशिभविष्य
मीन
मीन – लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील, आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

Back to top button