शेवगा ठरतोय कल्पवृक्ष! | पुढारी

शेवगा ठरतोय कल्पवृक्ष!

कोगनोळी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी के. पी. पाटील यांनी दोन एकर शेतीत शेवगा बाग फुलवली आहे. सध्याच्या स्थितीत दरदेखील चांगला मिळत असल्याने प्रयोगशील शेतकर्‍यांनी या पिकाकडे गांभीर्याने पाहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

अधिक वाचा : कृषिअर्थ : भाज्या आणि फळांची नासाडी कशी टाळता येईल?

अधिक वाचा : पीकपाणी : पिकांसाठी मातीतील सिलिकॉन घटक का महत्त्वाचा?

गतवर्षी द्राक्षे २० ते ३० रुपये किलो कमी दराने विकावी लागली होती. तुलनेने शेवगा दराबाबत ५० ते ६० रुपये, तर काहींना १०० रुपये किलो असा उच्चांकी दर मिळाला आहे.

या शेवग्याच्या जातीची लागवड दोन एकरवर केली आहे. २ हजार झाडे यात आहेत.

४ ट्रॉली शेणखत वापरून सेंद्रिय शेवगा उत्पादित करण्यावर भर आहे. आता चार महिन्यांत फुलोर्‍यात पीक आले आहे.

दीड महिन्यांत आता तोडा सुरू होईल. कमी पाण्यावर ही शेती शक्य आहे.

समूहशेती, गटशेती, कोल्ड स्टोरेज यांची सोय झाल्यास शेवगा स्टोरेज करून दर असेल त्यावेळी निर्यात करता येऊ शकते. सध्या ५५ रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे.

वाचा: कृषी कायदे राज्यात जसेच्या तसे लागू करा, भाजप नेते अनिल बोंडे यांची मागणी

वाचा: जाणून घेऊया थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया आजाराविषयी…

गुजरातमध्ये पानांची विक्री केली जाते. नामांकित औषधी कंपन्या पानांची खरेदी करू लागल्या आहेत.

शेवग्याच्या पानाची पावडर ६ हजार रुपये किलो दराने विकली जाते. या पावडरमध्ये पोषण मूल्ये जास्त आहेत. फांद्या पशुखाद्यासाठी वापरल्या जातात.

दरम्यान, लिंगनूर येथील शेतकरी मिलन नागणे यांनी उत्पादित केलेल्या शेवग्यास गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही उच्चांकी किलोला ११० रुपये दर मिळाला होता.

‘वसंत ओडीशी’ या जातीच्या शेवगा पिकाची लागवड जोमात आहे.

शेवगा पिकाच्या फक्त शेंगा नव्हे, तर औषधी गुणधर्म म्हणून पाने, फांद्यासुद्धा विकल्या जातात. त्यामुळे येणार्‍या काळात शेवगा लागवडीला चांगले दिवस येतील.

– प्रवीण जगताप

Back to top button