आजचे राशिभविष्य (२ फेब्रुवारी २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (Today’s Horoscope)

राशिभविष्य
मेष

मेष : आज आपल्या आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही. सभोवतालचे लोक मनोधैर्य वाढवतील. वडिलांचा सल्ला धनलाभ करून देऊ शकतो.
वृषभ
वृषभ

वृषभ : आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे दिवस उत्साहवर्धक असेल. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका.
राशिभविष्य
कर्क

कर्क : नोकरी पेशात असाल तर आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर तुमच्या कार्यक्षेत्रात करू शकता. तुम्ही खरेदीला गेलात तर स्वत:साठी चांगले कपडे घ्याल.
सिंह
सिंह

सिंह : कष्टाने यश मिळू शकेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील मतभेद दूर होतील.
राशिभविष्य
कन्या

कन्या : ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्याची संधी मिळेल. ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत, तर तुमच्या हितालाच बाधा येईल.
तुळ
तुळ

तूळ : विनाकारण स्वत:ला दोष देऊन तुमचा उत्साह घालवू नका. येनकेनप्रकारे आर्थिक लाभ होतील. पालकांचे आरोग्य हा दखल घेण्याचा व चिंतेचा विषय असेल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल.
राशिभविष्य
धनु

धनु : जे लोक बेरोजगार आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची गरज आहे. त्यामुळेच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील.
राशिभविष्य
मकर

मकर : राहिलेली देणी परत मिळवाल किंवा प्रकल्पांसाठी निधी मागाल. कुटुंबातील सदस्यांना जीवनात विशेष स्थान असेल. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून त्यांना काय हवे आहे, तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका.
मीन
मीन

मीन : घरातील प्रलंबित कामे आज तुमचा वेळ खातील. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल.

Back to top button