आजचे राशिभविष्य (२५ जानेवारी २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२५ जानेवारी २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : हवेत इमले बांधण्यात वेळ वाया घालवू नका. अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर ऊर्जा खर्च करा. पालकांच्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य.
वृषभ
वृषभ

वृषभ : व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. दूर अंतरावर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील.
राशिभविष्य
कर्क

कर्क : आध्यात्मिक गुरू, वडीलधार्‍यांकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्हाला जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल, तर आज ती इच्छा पूर्ण होईल.
सिंह
सिंह

सिंह : थोडा आराम, विश्रांती मिळेल. काळजी घेणारा मित्र भेटेल. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत वचन देऊ नका.
राशिभविष्य
कन्या

कन्या : जे लोक दूध व्यवसायात आहेत अशांना आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. गरज भासलीच तर मित्र नक्की मदतीला धावून येतील.
राशिभविष्य
तुळ

तुळ : तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा. इतरांवर खर्च करणे टाळा.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. आज सर्वचजण तुमच्याशी मैत्रीचा प्रयत्न करतील आणि तुम्हीही हे बंधन आनंदाने स्वीकाराल.
राशिभविष्य
धनु

धनु : तुमचे धैर्य पाहून तुम्हाला प्रेम मिळेल. अपेक्षित असलेली कौतुकाची थाप आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल.
राशिभविष्य
मकर

मकर : दिवस रोमँटिक असण्याचे संकेत आहेत. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. बराच काळ वाट पाहात असलेली कीर्ती, मान्यता मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. कामकाजाच्या ठिकाणी होणार्‍या विविध बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल.
राशिभविष्य
मीन

मीन : कामातील चुका मान्य करणे फायद्याचे ठरेल. स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असल्यास माफी मागा.

Back to top button