Computer Literacy Day : कॉम्‍प्‍युटर वापरताय? 'या' आहेत A टू Z Keyboard shortcut keys | पुढारी

Computer Literacy Day : कॉम्‍प्‍युटर वापरताय? 'या' आहेत A टू Z Keyboard shortcut keys

पुढारी ऑनलाईन डेस्क :  आधुनिक युगात वेगाने वाढणारे तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांतीमुळे संगणक मानवी जीवनातील अत्यावश्यक भाग बनला आहे. कॉम्‍प्‍युटरमध्ये रोज नवनवीन बदल होत असतात. त्या बदलांना सामोरे जाण्यासाठी कॉम्‍प्‍युटरचे अपडेटेड ज्ञान खूप महत्त्वाचे ठरते. जे अतिशय अचूक, जलद आणि अनेक महत्त्‍वाची कामे सहजतेने पूर्ण करू शकते. (Keyboard shortcut keys)  याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २ डिसेंबर हा जागतिक कॉम्पुटर साक्षरता दिन (World Computer Literacy Day) म्हणून पाळला जातो.

कॉम्‍प्‍युटर क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत चाललीये. नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्या गोष्टी शिकणे आपल्याला अपडेट राहण्यास मदत करते. आजकाल आपण प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट शोधत असतो. कॉम्‍प्‍युटरला कमांड देण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपर्सनी शॉर्टकट कीज डेव्हलप केल्या. त्यापैकी काही कीज् आपल्याला माहीत आहेतच. जसे की, कॉपी ctrl+C,  पेस्ट ctrl+V. शॉर्टकटमुळे तुम्हाला कॉम्पुटरवर काम जलदगतीने करण्यास मदत होते. जाणून घेऊया वर्डपॅड वरील Ctrl A ते Z पर्यंत वापरल्या जाणार्‍या शॉर्टकट की बद्दल…(Keyboard shortcut keys)

Keyboard shortcut keys

‘या’ आहेत A टू Z शॉर्टकट ‘की’ज (Keyboard shortcut keys)

ctrl + A = सर्व मजकूर निवडण्यासाठी (select all)
ctrl + B = निवडलेला मजकूर ठळक करण्यासाठी (bold the text)
ctrl + C = निवडलेला मजकूर कॉपी करण्यासाठी (copy the text)
ctrl + D = रेखाचित्र (Drawing) ॲड करण्यासाठी (add paint)
ctrl + E = निवडलेला मजकूर मध्यभागी घेण्यासाठी (alignment center)
ctrl + F = शब्द/ वाक्य शोधण्यासाठी (find a phrase)
ctrl + G = विशिष्ट पानावर किंवा ओळीवर जाण्यासाठी (Go to specific page or line)
ctrl + H = एक मजकूर दुसऱ्या मजकुराने बदलण्यासाठी (Replace text with another text)
ctrl + I = मजकूर इटॅलिक (तिरका) करण्यासाठी (Italicize text)
ctrl + J = मजकूर पानावर एका सरळरेषेत दिसण्यासाठी (align justify to the text)
ctrl + K = हायपरलिंक टाकण्याची विंडो उघडण्यासाठी (Open insert hyperlink window)
ctrl + L = मजकूर डावीकडे घेण्यासाठी (align Left to the text)
ctrl + M = परिच्छेदाची सुरूवात डावीकडून करण्यासाठी (Indent a paragraph from the left)
ctrl + N = नवीन फाईल उघडण्यासाठी (Open new document or file)
ctrl + O = तुम्ही ज्या फाईलमध्ये आहात त्याचा पत्ता समजण्यासाठी (open the file location)
ctrl + P = प्रिंट काढण्यासाठी (Print the document)
ctrl + Q = परिच्छेद फॉरमॅटिंग काढून टाकण्यासाठी (Remove paragraph formatting)
ctrl + R = मजकूर उजवीकडे घेण्यासाठी (align Right to the text)
ctrl + S = फाईल सेव्ह करण्यासाठी (save the file)
ctrl + T = हँगिंग इंडेंट तयार करण्यासाठी. म्हणजेच जेव्हा एखाद्या परिचछेदाला तुम्ही हँगिंग इंडेंट देता तेव्हा पहिली ओळ सोडून बाकीच्या ओळी उजव्या बाजूला सरकतात. (Create a hanging indent)
ctrl + U = निवडलेला मजकूर अधोरेखित करण्यासाठी (underline the text)
ctrl + V = कट किंवाा कॉपी केलेला मजकूर पेस्ट करण्यासाठी (paste the text)
ctrl + W = उघडलेली फाईल बंद करण्यासाठी (Close opened document)
ctrl + X = निवडलेला मजकूर कट करण्यासाठी (cut the text)
ctrl + Y = कोणतीही पूर्ववत क्रिया पुन्हा करण्यासाठी (redo)
ctrl + Z = कोणतीही क्रिया पूर्ववत करण्यासाठी (undo)

हेही वाचा:

Back to top button