जाणून घ्या आजचे राशिभविष्य - पुढारी

जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष-इच्छेला कर्माची साथ व अथक प्रयत्नामुळे कार्यसिद्धी होईल. मनासारख्या घटना घडतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. लोकांचा विश्वास संपादन कराल.
वृषभ – स्वतःसाठी वेळ द्या. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. दवाखाण्यासाठी खर्च होईल. सरकारी कामे रखडतील. मनःस्ताप होण्याची शक्यता.
मिथुन – आहार-विहार, आचार -विचाराकडे लक्ष द्या. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता.
कर्क – कौटुंबिक निर्णयात सहभागी व्हाल. मानसन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. मनोरंजनामध्ये दिवस जाईल. भागीदारीमुळे प्रगती होईल.
सिंह – सौख्यकारक घटना घडतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. उत्तम आरोग्याचा दिवस. कोण-आपले कोण शत्रू लक्षात येईल. अचानक धनलाभाचे योग.
कन्या – नियम मोडल्याने दंडात्मक कारवाई होईल. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. कामांमध्ये अडचणी येतील.
तूळ – कृतकर्माचे भय निर्माण होईल. आत्मविश्वास व उत्साह कमी होईल. पोटासंबंधित जुने आजार उद्भवतील. जवळच्यांकडून विश्वासघात होईल.
वृश्चिक – वादविवादात यश मिळेल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. जिवलगांचा सहवास लाभेल. उत्तम व मनासारख्या खरेदीचे योग संभवतात.
धनु – क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. आत्मसन्मानासाठी लोकांना सहकार्य करावे लागेल. दोन्ही बाजू समजूनच निर्णय घ्या. आत्मचिंतनाची गरज आहे.
मकर – भाग्यकारक घटना घडतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. खरेदीचे योग संभवतात.
कुंभ – नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील. विश्वासार्हता गमावण्याची वेळ येऊ शकते. अनावश्यक खर्च टाळा.
मीन – इच्छुकांचे विवाह योग संभवतात. प्रेम प्रकरणात यश मिळेल. जुन्या मित्रांबरोबर आनंदामध्ये दिवस जाईल. आर्थिकद़ृष्ट्या उत्तम दिवस. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.

Back to top button