आरतीचे तात्पर्य | पुढारी

आरतीचे तात्पर्य

आरतीचे तात्पर्य : भागवतकारांनी नवघ्या भक्तीस श्रेष्ठ मानले आहे. तिच्यात श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चना, वंदना वगैरे यानंतर होते ती आरती. पूजेमध्ये ज्या त्रुटी राहून जातात त्याची आरतीमुळे पूर्ती होते. संस्कृतमध्ये आरती या शब्दाला पर्याय आहे, तो म्हणजे विश्रांती देणे, थांबणे वगैरे.

आरती काय आहे आणि कशी केली पाहिजे?

आरतीस आरात्रिक किंवा आरार्तिक आणि निरांजन असेही म्हणतात. पूजेच्या शेवटी आरती केली जाते. पूजेमध्ये ज्या त्रुटी राहून जातात त्याची आरतीमुळे पुर्तता होते. स्कंद पुराणात (आरतीचे तात्पर्य) म्हटले आहे की,

मंत्रहीन, क्रियाहीनं यतू कृतं पूजनं हरे :
सर्व संपूर्णतामेति कृते निरांजने शिवे

पूजन मंत्रहीन आणि क्रियाहीन होऊनही निरांजन (आरती) करण्यामध्येच सर्व पूर्णता भरून येते. आरती करण्यासाठी नाही, तर आरती पाहणाऱ्यांसाठीही मोठे पुण्य पदरात पडते.

धूपं चारात्रित पश्येत्‌ कराभ्या च प्रवन्दते
कलकोटि समुध्दत्यु यति विष्णो: पद पदम्

जो धूप आणि आरतीस पाहतो, आणि दोन्हीही हातात आरती घेतो, तो कोटी पिढ्यांचा उध्दार करीत असतो. आणि भगवान श्रीविष्णूच्या परम-पूज्य पदास प्राप्त होतो. आरतीत पहिले मूळ मंत्राद्वारे (ज्या देवतेचे, ज्या मंत्राने पूजा केली जाते, त्याच मंत्राने) तीन वेळा पुष्पांजली दिली पाहिजे व ढोल, नगारे शख वगैरे महा जयजयकार ह्या शब्दाबरोबर शुभ्र भांड्यात तुपात किंवा कापूर विषम : उदा. ५,७,९,११,१५,२१

अनेक दिवे जाळून आपती केली जाते.
ततश्च मूलमंत्रेण दत्वा पुष्पांत्र्जालेत्रयम्‌
महानीराजनं कुर्यान्तमहावाध्या जयस्वनै:
प्रज्वलयेतू तदर्थ च कर्पूरेण धुतेन वा
आरात्रिकं शुभे पात्र विषमानेक वार्तिकम्

साधारण: पाच दिवे लावून आरती केली जाते. पंचप्रदीप ही सात व त्याहून अधिक दिवे लावून आरती केली जाते. कर्पूर (कापूर) यानेसुद्धा आरती केली जाते.

कुंकमागुकर्पूर रघृतचंदनिर्मिता: वर्तिका:
सप्त वा पंच कृत्वा वा दीपवीत्तिकाम्
कुर्यात सप्तप्रदीपेन शंखघण्टादिवाध्य कै:

कुंकम किंवा कापूर, तुपाचे आणि चंदनाचे पाच किंवा सात दिवे (कापूस आणि तूप यांपासून) शंख, घंटा आधी वाजवून आरती केली पाहिजे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : गणपतीच्या ३०० पेक्षाही जास्त दुर्मिळ मूर्तींचा संग्रह

Back to top button