Ganesh Utsav 2023 : मारुतीची आरती | पुढारी

Ganesh Utsav 2023 : मारुतीची आरती

Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली.  श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. मिरवणुकांमध्ये लेझीम, दांडपट्टा, ढोल ताशांच्या जोडीला डीजे आणि लेझर शो चा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणेश उत्सवचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह मारुतीची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळातील पुजेत म्‍हटली जाते.

मारुतीची आरती

जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतांता ।। धृ० ।।

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनीं ।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतांता ।। धृ० ।।

दुमदुमली पाताळें उठला पडशब्द ।
थरथरिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगणउच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।

जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतांता ।। धृ० ।।

हेही वाचलंत का? 

Back to top button