गणेश उत्‍सव २०२३ : श्री जोतिबाची आरती | पुढारी

गणेश उत्‍सव २०२३ : श्री जोतिबाची आरती

गणेश उत्‍सव २०२३ : लाडक्या गणरायांच्या आगमनासाठी घरोघरी तयारी सुरू आहे. त्यासाठी घराघरात साफ-सफाई, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. गणपती बाप्पांसाठी वैशिष्ट्यपूर्ण देखावे करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या आहेत. लोकांनी आधीच गणेश मूर्ती आगाऊ पैसे देऊन बूक करून ठेवली आहे. तर गणपती सह गौरीचे आगमन करण्यासाठीचीही लगबग सुरू आहे. गौरी-गणपतींसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक मखरे आणण्यात आली आहे. तर मंडळांनी गणेश मूर्ती मंडळात आणून ठेवल्या आहेत. यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला मंगळवारी असून या दिवसापासून सार्वजनिक गणेश उत्‍सवाला प्रारंभ होत आहे. या गणेशोत्सव काळात गणपतीच्या आरतीसह श्री जोतिबाची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळात म्‍हटली जाते.

गणेश उत्‍सव २०२३ : श्री जोतिबाची आरती

जयदेव जयदेव जय जय केदारा।
दासा संकटी तारा भवभय निवारा ॥धृ॥

भागिरथी मूळशीतल हिमाचलवासी।
न लगत पल खल-दुर्जन संहारी त्यासी।
तो हा हिम-केदार करवीरापाशी।
रत्नागिरीवर शोभे कैवल्यराशी॥1॥

जयदेव जयदेव जय जय केदारा।
दासा संकटी तारा भवभय निवारा ॥धृ॥

उत्तरेचा देव दक्षिणी आला।
दक्षिण-केदार नामे पावला।
रत्नासुर मर्दोन भक्ता पावला।
दास म्हणे थोर भाग्ये लाभला॥2॥

जयदेव जयदेव जय जय केदारा।
दासा संकटी तारा भवभय निवारा ॥धृ॥

जयदेव जयदेव जय जय केदारा।
दासा संकटी तारा भवभय निवारा॥
जोतिबाच्या नावानं चांगभलं।

जयदेव जयदेव जय जय केदारा।
दासा संकटी तारा भवभय निवारा ॥धृ॥

हेही वाचलंत का? 

Back to top button