आजचे राशिभविष्य (दि. ५ ऑक्‍टोबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ५ ऑक्‍टोबर २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष : मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नवीन घटना घडू शकतात; पण त्या सकारात्मकच असतील. प्रगती, उन्नती होईल.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल. यशाचे प्रमाण वाढते राहील. व्यावसायिक जुनी येणी येतील, मनाप्रमाणे खर्च करू शकाल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : कुटुंबात मंगल कार्याची नांदी घडेल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चांगला वाव मिळेल. जीवनसाथीचे उत्तम सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
कर्क

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील. गृहसौख्य उत्तम. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात उलाढाल वाढून नफा वाढेल.
राशिभविष्य
सिंह

सिंह : धनप्राप्तीचे प्रभावी योग, अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. व्यावसायिक जुनी येणीदेखील येतील. प्रगती करू शकाल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : उत्साहाने आणि आनंदाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल.आत्मविश्वासात वाढ होऊन इतरांना आपली मते पटवून देऊ शकाल.
राशिभविष्य
तुळ

तुळ : भरभराट होईल. मनासारख्या घटना घडतील. इच्छापूर्तीचा दिवस. खर्चावर थोडे नियंत्रण ठेवायला हवे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नोकरीत आपल्याला अधिकार वाढवून मिळतील; पण जबाबदार्‍याही वाढतील. धनलाभदेखील होण्याची शक्यता.
राशिभविष्य
धनु

धनु : पर्यटन किंवा कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरीत नवीन जबाबदार्‍या अंगावर पडतील. स्वभावात चिडखोरपणा डोकावू शकतो. क्रोधावर नियंत्रण हवे.
राशिभविष्य
मकर

मकर : आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज. उधार उसनवारी करू नका. अनावश्यक खर्च टाळा. कोणाच्याही बोलण्यात येऊ नका.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : जमिनीच्या व्यवहारात अथवा स्थायी संपत्तीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. त्यामुळे नुकसान टळेल. पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल.
राशिभविष्य
मीन

मीन : जीवनसाथीच्या मतास प्राधान्य दिल्यास आपली महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील. धाडसी निर्णय घेतले जातील.

Back to top button