आजचे राशिभविष्य (दि. ३ ऑक्टोबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ३ ऑक्टोबर २०२२)

 

राशिभविष्य
मेष
मेष ः महत्त्वाच्या कामासाठी जवळचे तसेच दूरचे प्रवास संभवतात. प्रवास कार्य सिद्ध होतील. मात्र, खाण्या-पिण्यावर नियंत्रण आवश्यक.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः आपल्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वरिष्ठांचे तसेच सहकार्‍यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळत राहील. कुटुंबात शुभवार्ता मिळतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात आर्थिक मदत मिळू शकते. कर्ज मंजूर होऊ शकते. कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः आरोग्य उत्तम राहील, यामुळे आपल्यासमोरील कामे आपण वेगाने पूर्ण कराल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द आणि चिकाटीमध्ये वाढ होईल.
सिंह
सिंह
सिंह ः कोणत्याही कामात घाईगडबडीने निर्णय घेऊ नका. निर्णय चुकीचे होऊ शकतात. पर्यायाने नुकसान संभवते. शक्यतो महत्त्वाची कामे पुढे ढकला.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः जुनी मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंद होईल. काही नवीन परिचय होऊ शकतात. त्यामुळे वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता. दिवस आनंदात जाईल.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खूश राहतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड होऊ शकते. केलेल्या कामाचे चीज होईल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः एखादी महत्त्वाची बातमी समजल्यामुळे कामाच्या स्वरूपात बदल करावा लागेल. धावपळीची शक्यता.स्थावर मालमत्तेसंबंधी कार्य पुढे ढकलावे.
धनु
धनु
धनु ः काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण आता अचानक वाढल्यामुळे चिंतित राहू शकता, धावपळ होईल.
राशिभविष्य
मकर
मकर ः कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीसंबंधी वार्ता कानी आल्यामुळे आनंदित राहाल. कुटुंबासाठी खरेदी कराल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते. केलेल्या कामाचे बक्षीस मिळेल. भाग्याची साथ मिळून वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक चांगली राहील.
मीन
मीन
मीन ः जीवनसाथीबरोबर असलेले मतभेद संपुष्टात येऊन नात्यात मधुर संबंध निर्माण होतील. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील.

 

– ज्यो. मंगेश महाडिक 

Back to top button