आजचे राशिभविष्य (दि. ३० सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ३० सप्टेंबर २०२२)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य

मेष

मेष : कुटुंबात आपल्या मतास प्राधान्य दिले जाईल. मंगल कार्ये ठरतील. नोकरीच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. मात्र, काही महत्त्वाची कामे निघतील.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : महत्त्वाच्या बातम्या समजतील. बाहेरील कामात संतुलन साधत काम पूर्ण कराल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रातील जातकांना उत्तम कालावधी. चांगले वाचन होईल. साहित्य क्षेत्रातील जातकांना मानसन्मान मिळेल.
राशिभविष्य
कर्क

कर्क : महत्त्वाचे निरोप मिळतील. हाती घेतलेली महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. दगदग होईल अशी कामे करू नका.
राशिभविष्य
सिंह

सिंह : नोकरीत कुटुंबात कार्यस्थळी महत्त्वाच्या विषयात तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या कामाची कदर होईल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : नियोजनात आयत्या वेळी बदल करावा लागेल. काही अडचणी येण्याची शक्यता, त्यात वेळ जाऊ शकतो. नोकरीत मनासारख्या घटना घडतील.
राशिभविष्य
तुळ

तूळ : व्यवसाय, नोकरीत अंदाज बरोबर ठरल्यामुळे महत्त्व वाढेल. कुटुंबातील मुलांना यश, त्यामुळे घरात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : सामाजिक जीवनातून त्रास निर्माण होऊ शकतो. सरकारी स्वरूपाची कामे नकोत. कुटुंबासाठी खर्च होईल. तरुण-तरुणींच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.
राशिभविष्य
धनु

धनु : घरगुती जबाबदार्‍या वाढतील.नोकरीत अपेक्षित घडामोडी घडतील. प्रेमात अतिरेक नको. आनंदी राहाल. प्रवासाचे योग. वाहने जपून चालवा.
राशिभविष्य
मकर

मकर : दागदागिने, महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा. गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाची बातमी समजू शकते.
कुंभ -
कुंभ

कुंभ : वादग्रस्त प्रश्न जपून हाताळा.कुटुंबातील वादविवाद टाळा. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत सकारात्मक राहा.शिस्त पाळा. उधारी वसूल होईल.
राशिभविष्य
मीन

मीन : आर्थिक जुगार टाळा. फसवणुकीची शक्यता. कुटुंबात सुवार्ता येतील. मंगल कार्य घडू शकते. लहान- मोठ्या प्रवासाचे योग.

Back to top button