आजचे राशिभविष्य (दि. २९ सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २९ सप्टेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः महत्त्वाच्या कामांना चालना मिळाल्यामुळे उत्साह आणि हुरूप वाढेल. महत्त्वाची माणसे तसेच नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. लोकसंग्रह वाढेल. नवीन ओळखी होतील. महत्त्वाची कामे होण्यातील अडथळे दूर होतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः सरकारी नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपविले जाण्याची शक्यता. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तशी संधी मिळू शकते. प्रयत्न यशस्वी होतील.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः जनमानसात सुसंवाद राहील. सकारात्मक विचार राहतील. उत्साहवर्धक घटना घडतील. भाग्याची चांगली साथ राहील.
सिंह
सिंह
सिंह ः महत्त्वाची कामे होतील. बर्‍याच दिवसांपासून अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कागदपत्रांची पूर्तता करताना खबरदारी घ्या.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. काहींना देवदर्शनाचा योग येईल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः अनुकूल घटना घडल्यामुळे उत्साह वाढेल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होऊन ती कामे पूर्ण होतील. मन आनंदी राहील. भाग्याची साथ मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः तरुण-तरुणींना अपेक्षित संधी मिळतील. विवाहासारख्या कार्यातील अडथळे दूर होतील. विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल.
राशिभविष्य
धनु
धनु ः नोकरीत वरिष्ठांचा जाच सहन करावा लागेल. सहकार्‍यांबरोबर आपुलकीने वागलेले बरे राहील. कामाचा ताण जाणवेल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
राशिभविष्य
मकर
मकर ः अनुकूल दिवस असल्याने त्याचा फायदा घ्या. नकारात्मकता झटकून कामाला लागा. नोकरीत चांगली स्थिती असेल. व्यवसायात विक्री वाढून समाधान लाभेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ ः आर्थिक बाजू बळकट राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहून सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. आनंद वार्ता कानी येतील.
मीन
मीन
मीन ः कुटुंबातील मुला-मुलींबरोबर सुसंवाद साधा. त्यांचे प्रश्न समजून घ्या. ते सोडविण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी दगदग होऊ शकते.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button