आजचे राशिभविष्य (दि. २७ सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २७ सप्टेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः महत्त्वाचे निर्णय होऊन कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रगती होईल. कोणतेही निर्णय गडबडीत घेऊ नयेत. खर्चावर नियंत्रण आवश्यक.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत जाईल. प्रवासाचे योग.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः आप्तेष्ट, नातेवाईक, जुने मित्र भेटतील. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळलेले बरे. हाती घेतलेल्या कामात सफलता लाभेल.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः कामात लक्ष दिल्यास कार्य लवकर होऊन सुलभता येईल. अनावश्यक खर्च टाळा. बोलण्यापेक्षा कृतीवर लक्ष केंद्रित करा.
सिंह
सिंह
सिंह ः महत्त्वाची वार्ता समजेल. शासकीय कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. धावपळ करावी लागेल; पण महत्त्वाची कामे होतील. आरोग्याकडे लक्ष द्या.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः पारिवारिक समस्या सोडविता येतील. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या परिश्रमाचे योग्य मूल्य मिळेल. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीमध्ये रमाल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात यंत्रसामग्री व कामगार याविषयीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
राशिभविष्य
धनु
धनु ः स्वप्नरंजनात रमू नका. प्रत्यक्षातील परिस्थितीचे विचारपूर्वक अवलोकन करून निर्णय घ्या. आजचे काम उद्यावर ढकलणे नुकसानकारक ठरू शकते.
राशिभविष्य
मकर
मकर ः लहान-मोठ्या कार्यासाठी प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घेणे जरूरीचे. अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो; परंतु गुणांना योग्य प्रतिसाद मिळेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ ः बौद्धिक क्षेत्रातील काम करणार्‍या जातकांसाठी अनुकूल दिवस. जोडीदारावर विश्वास ठेवा. व्यवसायात भागीदाराबरोबर मतभेदाची शक्यता.
मीन
मीन
मीन ः कार्यात समाजातील अथवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळेल. मोठ्या माणसांचे आशीर्वाद लाभतील. कामे मार्गी लावू शकाल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button