आजचे राशिभविष्य (दि. २३ सप्टेंबर २०२२)

मेष
मेष ः अचानक उद्भवणार्‍या प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्याल. महत्त्वाचे निकाल लागतील. सामाजिक कार्यात रस घ्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ
वृषभ ः आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. नवीनतेचे संबंध निर्माण होतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन
मिथुन ः अध्यात्माकडे कल राहील. एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल. व्यवसाय-धंद्यामध्ये अथवा नोकरीत सहकार्‍यांचे सहकार्य लाभेल.
कर्क
कर्क ः अनेक दिवसांनी जुने मित्र भेटल्यामुळे आनंद होईल. व्यावसायिक जुने संबंध नव्याने निर्माण होतील. घरातील वातावरण समाधानकारक राहील.
सिंह
सिंह ः निरनिराळ्या मार्गांनी धनलाभ होईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या
कन्या ः सरकारी कामांना वेळ लागू शकतो. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. संतती सौख्य लाभेल. जीवन साथीचे सहकार्य लाभेल.
तुळ
तूळ ः व्यवसायात नव्या संकल्पना व नवीन तंत्रज्ञान वापरून व्यवसाय एका विशिष्ट उंचीवर येऊन ठेवण्यात यशस्वी व्हाल. जुनी येणी वसूल होतील.
वृश्चिक
वृश्चिक ः दीर्घकालीन प्रलंबित असलेली अवघड कामे होतील. वाहने सावकाश चालवा. अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो.
धनु
धनु ः कुटुंबात आनंददायक घटना घडतील. कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीच्या वार्ता मिळतील. पाहुणे मंडळींचे आगमन होऊ शकते.
मकर
मकर ः आयत्या वेळेस कामात बदल झाल्यामुळे धावपळ करावी लागेल. खर्चामध्ये वाढ होऊ शकते; पण खर्च चांगल्या कामासाठी होईल.
कुंभ
कुंभ ः आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटीने आपल्यासमोरील कामे पूर्ण कराल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

 

मीन
मीन ः कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थतासुद्धा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा, तसेच कुटुंबात व कार्यस्थळी वाद-विवाद नको. कुसंगती टाळा.

– ज्यो. मंगेश महाडिक

Exit mobile version