आजचे राशिभविष्य (दि. १७ सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १७ सप्टेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- कमी कष्टामध्ये कार्यसिद्धी होणार आहे. महत्त्वाच्या कामांना तुम्ही प्राधान्य देणार आहात. व्यापार, व्यावसायिकांचे आलेले मळभ दूर होणार आहे.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- मनातील काही शंका दूर होणार आहेत. मनातील स्वप्ने सत्यात येण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामधील धोक्याचे वळण पार पडणार आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- नवीन शाखा सुरू करायची असल्यास दिवस अनुकूल नाही. नोकरी-व्यवसायात छोट्या-मोठ्या कटकटी येतील.
राशिभविष्य
कर्क
कर्क- शुभ ग्रहांचे भ—मण आपल्यासाठी अत्यंत चांगले आहे. व्यापार, व्यवसायाच्या वाढीच्या योजना अमलात आणल्यास दिवस चांगला आहे.
राशिभविष्य
सिंह
सिंह- सहकार्‍यांची मदत मिळणार नाही. खूप कष्ट करावे लागेल. कामाचा ताण जाणवेल. नियोजन केल्यास फारसा त्रास होणार नाही.
राशिभविष्य
कन्या
कन्या- आज मोठा आनंदाचा दिवस असेल. बर्‍याच दिवसांचे स्वप्न साकार होईल. लेखक, कवी यांना दिवस लाभदायक असेल.
राशिभविष्य
तुळ
तुळ- कार्यक्षेत्रात यश मिळेल. नवीन संधी असल्या तरी घरातील कामाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. वारसा हक्काच्या मालमत्तेविषयी निर्णय होतील.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक- कामामध्ये प्रगती होईल. नोकरीच्या मुलाखतीत यश येईल. परदेशातून शुभ समाचार येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
धनु
धनु- फारसा उत्साह नसणार आहे. नवीन नवीन कार्य समोर दिसतील; पण त्याचा फायदा घेऊ शकणार नाही. आपणामध्ये आत्मविश्वास वाढवावा लागणार आहे.
राशिभविष्य
मकर
मकर- नोकरदारांना आजचा दिवस चांगला. मानसिक चिंता संपतील. कार्यक्षेत्रात अधिक फायदा मिळेल. पैशासंबंधीचे प्रश्न सुटतील.
कुंभ -
कुंभ
कुंभ- अपरिचित व्यक्तींशी व्यवहार करू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्गी लागतील. अध्यात्मात मन रमेल.
मीन
मीन
मीन- व्यापार, व्यवसायांमध्ये मोठा लाभ होणार आहे. तरुण-तरुणींना शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीमध्ये गॉडफादर मिळेल.
  • – ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button