
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः दिवस अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांची आरोग्याची काळजी वाढेल. कोणतेही मोठे सौदे करू नका. नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः भागीदार व्यक्तींकडून लाभ होतील. स्वयंशिस्त व स्वनियंत्रण आवश्यक आहे. संमिश्र घटनांचा दिवस. खूप मोठे पाऊल उचलताना विचार करा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः घरच्या कामात किंवा कार्यक्षेत्रात व्यस्त राहाल. मानसिक तणाव जाणवेल. आर्थिकद़ृष्ट्या दिवस ठीक असेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः आपल्या कार्यामध्ये यश येईल. आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. प्रशंसा होणार आहे. मुलांची प्रगती होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः दिवस आनंद देणारा आहे. अनपेक्षित घटना घडतील. त्या आपल्या फायद्याच्या ठरतील. कार्यक्षेत्रामध्ये सहजता राहील. घरातून सहकार्य मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः शारीरिक, मानसिकद़ृष्ट्या धाडसी असाल. जोडीदारासाठी दिवस जास्त अनुकूल आहे. करिअरमध्ये यश मिळेल. प्रवास सफल होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः घराकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मानसिकरीत्या कणखर राहाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः सहकार्यांचा धोरणात्मक गोंधळ आणि गैरसमज होईल. महत्त्वाचे विस्तार आणि योजना थांबवा. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. व्यावहारिक राहा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः कौटुंबिक आयुष्यात अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. आर्थिकद़ृष्ट्या दिवस फार वाईट नसला तरी खर्च विचारपूर्वक करा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः व्यावसायिक पातळीवर चांगली प्रगती होईल. मात्र जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला चांगल्या संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ःवरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात चांगले बदल घडतील. नवीन कामे येतील. कामात व्यस्त राहाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः व्यवसायामध्ये यश येईल. नवीन संधी चालून येतील, संधीचा फायदा घ्या. आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. फायदेशीर प्रवास होतील. भाग्यवृद्धी होईल.[/box]