आजचे राशिभविष्य (दि. २४ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २४ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष ः दिवस अनुकूल नाही. विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे समोर जा. केवळ अंदाजावरून काम करू नका. गुंतवणूक टाळणे हितकारक ठरेल.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ ः दिवस आनंदाचा आहे. मैत्रीचे संबंध वाढतील. तुमचा सहवास इतरांना हवासा वाटेल. वाक्चातुर्याने कार्यसिद्धी करून घ्याल. आर्थिक लाभ होतील.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन ः जुळवून घ्याल. समोरच्याकडून काय फायदा आहे, याचे आकलन कराल. स्पर्धा आणि अडथळे यातून चांगला मार्ग काढाल. यश मिळेल.
राशिभविष्य
कर्क

कर्क ः निर्णय घेण्याची क्षमता आणि तारतमभाव जाणण्याची क्षमता उत्तम असल्याने लाभ होईल. आर्थिक फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
राशिभविष्य
सिंह

सिंह ः आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटेल. सकारात्मक विचार ठेवा. कामात व्यग्र राहा. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष द्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या ः कार्यक्षेत्रात छोटे मोठे बदल होतील. बदल लाभदायी ठरतील. भागीदाराच्या व्यवसायात फायदा होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल.
राशिभविष्य
तुळ

तूळ ः व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते. जास्त काम करावे लागेल. हाताखालील व्यक्तींची मदत घ्या. नोकरी-धंद्यात उत्तम काळ आहे. वरिष्ठांची मर्जी राखाल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक ः वैवाहिक जीवनासाठी अतिशय अनुकूल दिवस. संततीकडून अपेक्षा पूर्ण होतील. लेखक, कवी यांच्या लिखाणाची प्रशंसा होईल. प्रतिष्ठा मिळेल.
राशिभविष्य
धनु

धनु ः कुटुंबामध्ये एकोपा राहील याची काळजी घ्या. प्रगती होईल. घरातील महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी-विक्री होण्याची शक्यता. त्यात फायदा होईल.
राशिभविष्य
मकर

मकर ः नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवा. व्यवसाय वाढविण्यासाठी सहकार्य मिळेल. कामाचे नियोजन चांगल्या प्रकारे कराल. प्रवास घडेल. वस्त्र खरेदी कराल.
कुंभ -
कुंभ

कुंभ ः महत्त्वाची कामे मार्गी लागतील. घरातील वातावरणही आनंदी राहील. घरातल्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. मित्रांच्या गाठीभेटी होतील.
राशिभविष्य
मीन

मीन ः दीर्घकालीन योजना तूर्तास स्थगित ठेवा. शक्यतो प्रवास टाळणे चांगले. दुसर्‍या वर जास्त विश्वास ठेवू नका. सर्वप्रकारे सावध राहणे आवश्यक आहे.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button