आजचे राशिभविष्य (दि. ३१ ऑगस्ट २०२१)
मेष : अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका, आर्थिक नियोजन आवश्यक आहे. आपल्या वस्तू सांभाळून ठेवा, प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ : एकाग्रतेने कामे पूर्ण होतील, मनासारख्या घटना घडतील आत्मविश्वास वाढेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल, अलंकार, वस्त्र, मनासारखी खरेदी कराल.
मिथुन : नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका, प्रतिक्रिया देताना काळजी घ्या, जामीन राहू नका, आत्मचिंतनाची गरज.
कर्क : चिकाटीने व आत्मविश्वासाने व्यवसायामधे यश मिळेल, लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल.
सिंह : अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल, कामाचे कौतुक होईल, वरिष्ठांची मर्जी राखाल, कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.
कन्या : आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, नियमांचे पालन करा, आळस सोडायला हवा, मनाविरुद्ध घटना घडतील, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
तूळ : मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता योग्य निर्णय घ्या. नको तेच विषय समोर येतील, संयम ठेवणे गरजेचे आहे.
वृश्चिक : कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, जोडीदाराची साथ लाभेल, अभ्यास व सहकार्यांच्या साथीने आर्थिक उन्नती होईल.
धनु : नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग संभवतात, आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस, मध्यस्थी करून संतुलन साधाल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील.
मकर : मानसिकता व दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. कामाला प्राधान्य द्या, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, संवादाने प्रश्न सोडवावे लागतील.
कुंभ : नियोजित कामांत अडचणी येतील, क्रोधावर नियंत्रण हवे, आत्मविश्वास कमी होईल, आत्मचिंतनाची गरज आहे. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो.
मीन : कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल, आर्थिक प्रगती होईल, धनप्राप्तीचे योग संभवतात, नव्या मित्रमंडळींची ओळख होईल, लाभदायक दिवस.