आजचे राशिभविष्य (दि. २० ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २० ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः आपल्या प्रगतीसाठी संधी येणार आहे. कामाचे नियोजन पूर्व व सातत्याने करा. वरिष्ठांची मर्जी राहणार आहे. नवीन कामे मिळतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः व्यापार-व्यवसायात चांगले निर्णय घ्याल. तुमचे म्हणणे प्रत्येक व्यक्‍ती मनापासून ऐकेल. सामाजिक कामामुळे मानसिक समाधान लाभेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः इच्छा नसताना कामे करावी लागतील. मानसिकता बिघडण्याची शक्यता. जास्त विचार करू नका. शांतपणे निर्णय घेऊन काम करण्याची वेळ.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः तुमच्या आनंदी वृत्तीमुळे कामाचा वेग वाढेल. आवडते काम मिळेल. जोडीदाराचे सर्व प्रकारे साहाय्य लाभणार आहे. आर्थिक नियोजन ठीक असेल.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः धूर्त व्यक्‍तीशी सामना होईल. हुशारी पणाला लागेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रुंचा हुशारीने सामना कराल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः निर्णय चांगले होणार आहेत. ऊर्जेची पातळी चांगली असेल. मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीमुळे घरातील वातावरण आनंदी राहील. नवीन संधी येतील.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः शांततेत दिवस घालवाल. जास्त धावपळ आणि दगदग नको वाटेल. कुटुंबासमवेत आनंद साजरा कराल. अचानक प्रिय व्यक्‍तींच्या गाठीभेटी होतील.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक ः निर्णय योग्य आहेत की नाही ते तपासा. बहीण-भाऊ यापैकी कोणाला तरी आर्थिक मदत लागू शकते. जोडीदाराशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
राशिभविष्य
धनु
धनु ः स्वतःसाठी वेळ द्याल. मनन, चिंतन करा. बोलण्यातून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात विचारपूर्वक निर्णय महत्त्वाचे ठरतील.
राशिभविष्य
मकर
मकर ः प्रेम-प्रकरणात यश मिळेल. इच्छापूर्ती होईल. केलेल्या कामाची फळे चांगली मिळतील. सहकार्‍यांशी संवादातून वेळेचा सदुपयोग होईल.
कुंभ -
कुंभ
कुंभ ः देणे-घेण्याचे व्यवहार सांभाळून करा. समोरच्या व्यक्‍तीसाठी विनाकारण खर्च करताना विचार करा. काही कामांसाठी प्रवास होईल. प्रवासात अडचणी येतील.
राशिभविष्य
मीन
मीन ः कार्यक्षेत्रात प्रगती झाल्याने आपण आनंदी असाल. आपणास जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे. संवाद साधणार आहात. मनोरंजनासाठी वेळ देणार आहात.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button