आजचे राशिभविष्य (दि.१७ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.१७ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष ः वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. मन शांत ठेवून मनोधैर्य वाढवून कामे करा. वाद विकोपाला जाऊ देऊ नका. वाहने सावकाश चालवा.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ ः नोकरीमध्ये प्रगती आहे, व्यवहारात सावधगिरी बाळगा. धाडसी निर्णय घ्याल. निर्णय एकदा तपासून बघा. दूरदृष्टीने विचार करणे आवश्यक.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन ः आर्थिक स्थिती सामान्य राहील. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता. रागावर नियंत्रण ठेवा. काहींना प्रेमप्रकरणात यश मिळेल.
राशिभविष्य
कर्क

कर्क ः मुलांना यश मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. कामे नियोजनपूर्वक केल्याने दर्जेदार होतील. कामात प्रगती होणार आहे.
राशिभविष्य
सिंह

सिंह ः सौख्य वाढेल. मुलांना यश मिळेल. चांगल्या संधी चालून येतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. वादविवाद करू नका. मनःस्ताप होईल.
राशिभविष्य
कन्या

कन्या ः दैनंदिन कामे मार्गी लागतील. व्यवसायातील काही निर्णय अतिशय चांगले ठरतील. नवीन संदेश मिळतील. प्रगतीचा दिवस आहे. प्रवासाची शक्यता.
राशिभविष्य
तुळ

तूळ ः घरातील वातावरण समाधानकारक आहे. मानसिक शांतता ठेवून काम करा. आर्थिक व्यवहार चांगले होतील. उधारी वसूल होईल. आर्थिक प्राप्ती होईल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक ः मरगळ दूर होईल. काम करताना आनंद वाटेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जाणवेल. दुसर्‍यांकडून काम करून घ्याल. नियोजनाने कामे पूर्णत्वास जातील.
राशिभविष्य
धनु

धनु ः व्यवहार घाईगडबडीने कर करू नका. मानसिक स्वास्थ्य जपा. उधारी देणे टाळा. लवकर वसूल होणार नाही. कामास विलंब होईल. अनावश्यक खर्च टाळणे.
राशिभविष्य
मकर

मकर ः हुशारीने लौकिक मिळवाल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. नोकरी, व्यवसायात सुरळीतपणे काम होईल. कर्मचारीवर्गाचे सहाय्य घ्यावे लागेल.
कुंभ -
कुंभ

कुंभ ः तुमचे महत्त्व लोकांना पटेल, तुमच्या कामाचे कौतुक होईल, धार्मिक कामामध्ये सहभाग घेणार आहात. सरकारी कामांना गती येणार आहे.
मीन
मीन

मीन ः मनोबल चांगले राहील. नोकरीतील अस्थिरता निघून जाईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. प्रवासातून लाभ होईल. अनुकूल काळ आहे.

आजचे राशिभविष्य

Back to top button