Bharali Vangi : अशी करा स्वादिष्ट आणि खमंग भरली वांगी | पुढारी

Bharali Vangi : अशी करा स्वादिष्ट आणि खमंग भरली वांगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भरली वांगी (Bharali Vangi) हा पदार्थ ताटात आला रे आला की, तोंडाला लगेच पाणी सुटतं. आज कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही गेलात की, तुम्हाला भरली वांगी हमखास मिळते. भरली वांग्याची डिश इतकी आकर्षक असते की, खवय्ये त्यावर जोरदार ताव मारतात. आज ही भरली वांगी कशी करतात ते पाहू…

साहित्य : साधारण १० वांगी, २ कप दही, १ चमचा लिंबूचा रस किंवा चिंचेचा रस, २-३ हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्या, २ चमचे काळे मीठ, ४ चमचे गरम मसाला, १ चमचा जिरेपूड भाजून घ्या, २ चमचे चाट मसाला. १ चमचा धने पावडर, २ चमचे लाल तीखट, १ कप खिसलेला नारळ, १ चमचा मोहरी, १ चमचा तेल, लसणाच्या ४ कुडी पिसून घ्या, २ चमचे हळद.

कृती : सर्व प्रथम वांगी स्वच्छ धूऊन मधून कापू घ्या. एका बाऊलमध्ये दही, लिबांचा रस, कापलेल्या हिरव्या मिरच्या, धनपावडर, काळे मीठ, गरम मसाला, जिरेपूड, चाट मसाला, यांचं थोडं पाणी टाकून मिश्रण करू घ्या. कापलेली वांगी दह्यामध्ये मिसळून घ्या आणि मसाल्यात भिजवून ठेवा.

चटणी तयार करताना आणखी एका बाऊलमध्ये अर्धा चमचा जिरेपूड, २ चमचा धना पावडर, १ चमचा हळद, २ चमचे मीठ, खिसलेला नारळ, या सर्वांमध्ये चिंचेचं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्या. चांगली चटणी तयार झाली.

Bhareli Vangi

ही तयार झालेली चटणी काप घेतलेल्या वांग्यामध्ये भरून घ्या. त्यानंतर तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, लाल मिरची, लसणासाची पेस्ट टाकून अर्धा सेकंदापर्यंत भाजा. नंतर त्यामध्ये मसाला भरलेली वांगी सोडा. वांगी सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करत रहा. थोड्या वेळानंतर गॅस बंद करा. गरमा गरम भरली वांगी तयार…

ही स्वदिष्ट भरली वांगी (Bharali Vangi) खाण्यासाठी तयार झाली आहे. त्या बरोबर गरम चपाती किंवा फुलके किंवा तळलेली पूरी घ्या. चटणीसोबत भरली वांगी खायला आणखीच मजा येते.

हे लक्षात ठेवा : आपण जो मसाला तयार केला, तो इतर भाज्या करण्यासाठीदेखील वापरू शकता. भरली वांगी करण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम असते. किसलेला नारळ नसेल, तर कुटलेल्या शेंगदाण्याची चटणीदेखील वापरू शकता. तुम्ही भरल्या वांग्यामध्ये टोमॅटोदेखील वापरू शकतो.

पहा व्हिडीओ : बटर चिकनची ही रेसीपी खास तुमच्यासाठी…

Back to top button