९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक | पुढारी

९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक

कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने प्रतिभानगर येथे 15 ऑगस्ट 1983 रोजी हुतात्मा स्मारक साकारण्यात आले. याठिकाणी अकरा हुतात्म्यांच्या स्मृती क्रांतिज्योतीच्या माध्यमातून निरंतर जपल्या आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी दिनकरराव पाटील यांच्या हस्ते आणि तत्कालीन महापौर विलासराव सासने यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक महाराष्ट्र शासनाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. महापालिकेच्या वतीने दरवर्षी 9 ऑगस्टला क्रांति दिनी आणि 15 ऑगस्ट व 26 जानेवारीलाही अभिवादन करण्यात येते. महापालिका प्रशासनाच्या वतीने हुतात्मा स्मारकाची चांगली देखभाल केली जात आहे.

या ठिकाणी हुतात्मा चिमासाहेब महाराज (8/1/1831-15/5/1869), छत्रपती चौथे शिवाजी महाराज (5/4/1863-25/12/1883), बाबाजी भुजंग भोला, श्रीधर ऊर्फ अण्णा सीताराम फडणीस, तात्या ऊर्फ गंगाजीराव मोहिते (सर्व कोल्हापूर), फिरंगोजी नरसोजीबाजी शिंदे (गिरगाव) (1840-4/12/1857), रामसिंग इंदरसिंग रजपूत, कोल्हापूर (1857), बिंदू नारायण कुलकर्णी (1925-15/8/1942), नारायण दाजी वारके (कलनाकवाडी, ता. भुदरगड) (22/11/1919-13/12/1942), निवृत्ती गोविंद आडूरकर (कोल्हापूर) (1912-9/8/1943), गोपाळराव बळवंत फराकटे (कोल्हापूर) (1942-1945) यांचे स्मारक आहे.

Back to top button