आजचे राशिभविष्य (दि. २८ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २८ ऑगस्ट २०२१)

 

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – मनपसंत खरेदी करण्याचा योग संभवतो. लोकांना सहकार्य कराल. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्‍न होईल. संयमी वृत्तीमुळे व सहनशक्‍ती असल्यामुळे मोठी कामे पूर्ण होतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – कोणतीही गोष्ट अती करू नका. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्यदक्ष राहा. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – लाभदायक दिवस. दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. छोटे प्रवास घडतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्‍न सुटतील.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – प्रतिष्ठा वाढवणार्‍या घटना घडतील. सेवाकार्य घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. एकमेकांशी सल्ला-मसलत करून निर्णय घ्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्ताप होईल. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – दोन्ही बाजू समजून निर्णय घ्यावा. आरोग्याची काळजी आवश्यक आहे. गैरसमजातून वादविवाद होतील. उष्णतेचे आणि पित्ताचे विकार होण्याची संभावना.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-गृहसौख्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये प्रगती होईल. प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक – शत्रूंवर विजय प्राप्त कराल. थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौतुकास्पद काम कराल. पदोन्‍नतीचे योग संभवतात.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – मागील गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. अतिसाहस करू नका. कामांचे नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थीवर्गासाठी एकाग्रता व नम्रता आवश्यक आहे.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – वाद-विवादामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवा. अनावश्यक खर्च उभे राहतील. कौटुंबिक कलह टाळण्याचा प्रयत्न करावा.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – कला-गुणांना वाव मिळेल. लेखकांना लाभदायक दिवस ठरेल. व्यावसायिक प्रगती होईल. प्रलंबित कामांना गती मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. आळस व नियोजनशून्य वृत्तीमुळे अपयश येऊ शकते. योग्य आहार व व्यायामाची गरज आहे.

Back to top button