ब्रेकअप नंतर Ex ला सोशल मीडियावर अनफॉलो करावे का? | पुढारी

ब्रेकअप नंतर Ex ला सोशल मीडियावर अनफॉलो करावे का?

श्रेणिक नरदे : पुढारी ऑनलाईन : ब्रेकअपनंतरचा सर्वांत मोठा मानसिक त्रास कशाचा असतो? आपल्या एक्सकडे पुन्हा जाण्याची आणि मोडलेलं हृदय पुन्हा जोडलं जावं ही इच्छा. बऱ्याच वेळा यातील काही घडणार नसतं पण डोक्यातील विचार ही थांबत नसतात.

अशा वेळी ब्रेकअपनंतर तुमच्या एक्सला सोशल मीडियावर अनफॉलो करणं खरो खर किती आवश्यक असतं? ब्रेकअपच्या मानसिक त्रासातून जर लवकर सावरायचे असेल आणि नव्याने आयुष्य सुरू करायचे असेल तर एक्सला सर्व सोशल अकाऊंटवरून अनफॉलो करणं आवश्यक आहे.

प्रेमात पडणं सोपं असतं पण त्यापासून दूर जाणं फार कठीण असतं. सोशल मीडियाच्या जगात जर तुमचा किंवा तुमची एक्स सतत तुमच्या मोबाईलवर दर्शन देत असेल तर? सोशल मीडियातून एक्सवर सतत लक्ष ठेवणं हेही ओघाने आलंच. पण ही वेळ यासाठी नसते. जे महत्त्वाचं आहे, त्यावर लक्ष देणं, आयुष्यातील नकारात्मकता दूर करणं आणि स्वतःचा नव्याने शोध घेणं ही आताची गरज असते. म्हणून ब्रेकअप झाला तर सर्वांत आधी तुमच्या एक्सला सोशल मीडियावर अनफॉलो करा. या मागे इतरही काही कारणं आहेत, ती अशी.

स्पर्धा नको

ब्रेकअपनंतर तुझं आयुष्य जास्त चांगलं की माझं आयुष्य जास्त चांगलं हे दाखवण्याची स्पर्धा होऊ नये, हे महत्त्वाचं असतं. तिच्या किंवा त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता मनात येणं सहाजिक आहे, पण हे टाळलं पाहिजे. आपण जर एक्सला अनफॉलो केलं नाही तर त्या व्यक्तीचा प्रोफाईल आपण सतत चेक करत राहातो. एक्सबद्दल ऑब्जेस असण्याची आता काही गरज नाही.

लवकर सावराल

Because out of sight is out of mind अशी एक म्हणं आहे. जे नजरेसमोर नाही ते मनात नाही, असा याचा आशय आहे. अपयशी रिलेशनशीपमधून बाहेर पडण्यासाठी बराच काळ लागू शकतो. त्यामुळे तुमच्या एक्सला नजरेपासून दूर करावं हेच उत्तम असतं. त्यामुळे एक्सने काय ट्विट केले, फेसबुकला काय टाकले, इन्स्टावर काय फोटो आहे पाहात बसला तर तुम्ही या ब्रेकअपमधून लवकर बाहेर पडणार नाही. त्यामुळे एक्सला अनफॉलो करा आणि एक पाऊल मागे या. तुम्हाला दूरचा पल्ला गाठायचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.

तुम्ही एक्सला सतत मीस करणार नाही

सर्वसाधारण ब्रेकअप हा वाईट पद्धतीने झालेला असतो. फार कमी वेळा आपण चांगल्या पद्धतीने बाजूला झालेलो असतो. अशा वेळी कुणाचे चुकले याचा विचार करण्यातच जास्त वेळ जातो.

तुमचं मनाची ओढ ही एक्सकडे असू शकते. अशा वेळी जर त्याने किंवा तिने एखादा चांगला फोटो शेअर केला आणि तो तुमच्या नजरेत आला तर पूर्ण दिवस तो फोटो तुमच्या नजरेसमोरून जाणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा भूतकाळात जाता. खरे तर या सगळ्यातून फ्री होण्याची वेळ आलेली असताना, पुन्हा जुन्याच आठवणीत रमणे ही काही चांगली गोष्ट नक्कीच नाही.

पोस्ट ब्रेकअप ड्रामा टाळा

अनेक जण ब्रेकअपनंतर एक्सशी संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर मेसेज पाठवणे, एखाद्या पोस्टवर कमेंट करणे, असे आपल्याकडून होते. त्यातून काही वाद झाला तर सोशल मीडियावर आपल्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. हा सगळा ड्रामा टाळण्यासाठी ब्रेकअपनंतर एक्सला सोशल मीडियावर सरळ अनफॉलो करा.

हे ही वाचलत का :

ट्रेकर्सचा स्वर्ग हरिश्चंद्रगड कोकणकडा

Back to top button