आजचे आपले राशिभविष्य (दि. ६ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे आपले राशिभविष्य (दि. ६ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष

मेष ः आत्मविश्‍वास बाळगा. अचानक प्रवास संभवतो. प्रवासात आपणास चांगले फायदे मिळण्याची शक्यता. बहीण भावंडांकडून आनंद मिळेल. मोठा बदल नको.[/box]

 

राशिभविष्य
वृषभ

वृषभ ः व्यावसायिकांना चांगला दिवस. कामातील अडथळे दूर होतील. प्रगती होईल. घरचा विचार करता सर्व द‍ृष्टीने आपल्याला सुरक्षितता जाणवणार आहे. [/box]

राशिभविष्य
मिथुन

मिथुन ः दिवस मिश्र राहील. पैशापेक्षा कामात सुधारणा करण्याकडे लक्ष द्या. नवीन कामे येतील, योग्य पर्याय निवडावा लागेल. एका वेळी एकच काम करा. [/box]

राशिभविष्य
कर्क

कर्क ः स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतील. आत्मविश्‍वास वाढवा. एक तर स्वतःचे आरोग्य सांभाळा. कामातील अडथळे शांतपणे दूर करा. [/box]

राशिभविष्य
सिंह

सिंह ः मित्र आणि सहकार्‍यांशी सांभाळून वागा. विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या. व्यापारात काही आर्थिक फायदे होणार आहेत. [/box]

राशिभविष्य
कन्या

कन्या ः प्रकृतीस्वास्थ्य बिघडू शकते. थकवा येणारे काम करू नका. घरामध्ये काही त्रास असू शकतो. पण, नोकरीमध्ये प्रगती आहे. वरिष्ठांची मर्जी राखाल. [/box]

राशिभविष्य
तुळ

तूळ ः दिवस खूप आनंदाचा असेल. चिडचिड करू नका. नियोजन केल्यास सर्व कामे नीटनेटकी होतील. प्रवासाचे योग, धार्मिक कार्यात सहभाग असेल. [/box]

राशिभविष्य
वृश्चिक

वृश्‍चिक ः सर्व बाबतीत सकारात्मक विचार करा. कामात अडथळे आले तरी प्रयत्नाने ते सुटतील. आर्थिक प्रश्‍न सुटणार आहेत. सहकारी वर्गाशी वाद-विवाद टाळा. [/box]

राशिभविष्य
धनु

धनु ः स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवा. प्रवास घडेल. प्रवासात महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. जोडीदार सर्व प्रकारे सहाय्य देणार आहे, व्यवसायात फायदा होईल. [/box]

राशिभविष्य
मकर

मकर ः नोकरीमध्ये जास्त कष्ट पडतील. जास्त काम करावे लागेल. त्यामुळे मनोबल कमकुवत होईल. आत्मविश्‍वासाने काम करणे आवश्यक आहे. मनोबल वाढवा. [/box]

कुंभ -
कुंभ

कुंभ ः दिवस चांगला जाईल. कामाचे श्रेय आपल्याला मिळेल. जबाबदार्‍या पार पडल्यामुळे आपण खूश असणार आहात. उच्चभ्रू व्यक्‍तींशी ओळख होण्याची शक्यता. [/box]

राशिभविष्य
मीन

मीन ः मालमत्तेच्या व्यवहारात चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक प्रश्‍न सुटतील. कामात चांगली प्रगती होईल. व्यवसाय वृद्धी करण्याकडे लक्ष असणार आहे.[/box]

Back to top button