आजचे राशिभविष्य (दिनांक १ ऑगस्ट ) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक १ ऑगस्ट )

राशिभविष्य
मेष
मेष ः आज समाधानी वृत्ती राहील.आहे. नवीन लोकांच्या ओळखी होतील. सोपी कामे हातावेगळी करून टाका. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका.

 

राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः नवीन व्यवसायासाठी गुंतवणुकीसह नवीन मार्ग सुचतील. नवीन उधारी करू नका. खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. आक्रमक होऊ नका.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः नवीन परिचय होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ समाधानकारक राहील. कामांत सुयश येईल.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः दैनंदिन कामे मार्गी लागतील. नोकरीत स्थिती चांगली राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. रेंगाळलेली कामे करून घ्या.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. हातून दान-धर्म घडणार आहे. प्रवासाचे योग येतील. भाग्याची चांगली साथ राहील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः घरामध्ये वाद विवाद टाळो. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. आर्थिक आवक चांगली राहील. मनात विचारांची गर्दी होईल. वादात पडू नका.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. खरेदी कराल. समारंभात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील, भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. वाद-विवाद टाळा. घरगुती वाद त्रस्त करतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास टाळा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.
राशिभविष्य
धनु
धनु ः घरामध्ये आनंदी वातावरण असेल. नोकरीत चांगला कालावधी आहे. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल.प्रेमाची कबुली देण्यास हरकत नाही.
राशिभविष्य
मकर
मकर ः दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टी व्यवहार पुढे सरकतील. घरातील महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल. जिद्द व सातत्याने आपण कामे मार्गी लावाल.
कुंभ -
कुंभ
कुंभ ः तरुणांना नोकरी, व्यवसायामध्ये चांगली संधी मिळेल. कामामध्ये प्रगती होईल. नोकरीची अपेक्षित संधी येण्याची शक्यता. पैशाची आवक चांगली राहील.
राशिभविष्य
मीन
मीन ः प्रगतीचा वेग उंचावेल. पैशाची आवक चांगली राहील. अचानक धनलाभ होईल. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. नोकरी-व्यवसायात भरभराट होईल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button