आजचे राशिभविष्य (दिनांक ३१ जुलै २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक ३१ जुलै २०२२)

राशिभविष्य

मेष : मनाविरुद्ध घटना घडतील, मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळा, प्रेम-प्रकरणांमध्ये अडचणी येण्याची संभावना, संयम आवश्यक आहे.

राशिभविष्य

वृषभ : कौटुंबिक वातावरण बिघडेल, प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा, संतुलन साधणे महत्त्वाचे, अनावश्यक भीती निर्माण होईल.

राशिभविष्य

मिथुन : मैत्रीला जागा, बौद्धिक क्षमता वाढेल, मनासारखी खरेदी होईल, कला-गुणांना वाव मिळेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.

राशिभविष्य

कर्क : मानसिक संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस, परिश्रम घेणे आवश्यक, कौटुंबिक समस्या निर्माण होतील.

सिंह

सिंह : भाग्यकारक घटना घडतील, ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल, इष्ट ते साध्य होईल, आनंददायी दिवस, जुन्या मित्रमंडळींचीभेट होईल.

राशिभविष्य

कन्या : आत्मचिंतनाची गरज, काळजी घ्यावी, गैरसमजातून वादविवाद होतील, खर्चावर नियंत्रण ठेवा, ईर्ष्या, स्पर्धा करू नका.

राशिभविष्य

तूळ : व्यावसायिक भरभराटीचा दिवस, सुवार्ता ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग संभवतात, प्रेम-प्रकरणे मार्गी लागतील, वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

राशिभविष्य

वृश्‍चिक : पदोन्‍नती होईल, वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल, आत्मविश्‍वास वाढेल, यशाकडे वाटचाल कराल, मनासारख्या घटना घडतील.

राशिभविष्य

धनु : मानहानीचे प्रसंग निर्माण होतील, व्यायाम व योगसाधनेची गरज, सकारात्मक विचार महत्त्वाचे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.

राशिभविष्य

मकर : मन:स्ताप होण्याची शक्यता, वादविवादामध्ये पडू नका, आपली चूक मान्य करावी लागेल, सामंजस्याने विषय सोडवावेत.

कुंभ -

कुंभ : प्रेम-प्रणयाचा दिवस, आर्थिक परिस्थिती सुधारेल, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, छोटे प्रवास घडतील, जोडीदाराची साथ लाभेल.

मीन

मीन : आरोग्य उत्तम राहील. योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग, जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल, शत्रूपिडा कमी होईल.

Back to top button