आजचे राशिभविष्य (दि. २५ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २५ ऑगस्ट २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : खर्च करण्याचा मोह होईल. कर्ज होण्याची शक्यता आहे. कामांमध्ये अडचणी येतील. ईर्ष्या निर्माण होईल. गैरसमज दूर करा. दुसर्‍यावर अवलंबून राहणे सोडावे लागेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : आनंददायी घटना घडतील. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. अनपेक्षितपणे मित्रमंडळींची भेट होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. एकंदर भरभराटीचा दिवस.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. अथक प्रयत्नांना यश मिळेल. ईच्छापूर्तीचा दिवस. ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. अधिकारामध्ये वाढ होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होईल. सरकारी दंड सोसावा लागेल. छातीसंबंधित आजार निर्माण होण्याची शक्यता आहे. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह : अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. नुकसान होण्याची शक्यता. श्‍वसनासंबंधित आजार उद्भवतील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : लोभ-मोहाचे प्रसंग निर्माण होतील. मनासारख्या घटना घडतील. यशाकडे वाटचाल कराल. मानसन्मान होतील. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. अचानक धनलाभाचे योग संभवतात. शत्रूपीडा कमी होईल. सज्जनांचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक : दुःखदायक घटना घडतील. झालेल्या गोष्टींचा शोक करू नका. नियोजनाप्रमाणे कामे होणार नाहीत. आर्थिक नुकसानीची शक्यता. प्रतिष्ठेला धक्‍का लागणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : भीतीपोटी मनःस्वास्थ्य बिघडेल. पोटाचे विकार होण्याची संभावना. संतुलित आहार महत्त्वाचा. कौटुंबिक वातावरण विनाकारण बिघडू शकते. वादविवादापासून दूर राहावे.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : नियोजनामुळे ठरवलेल्या कामांत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. उत्तम वस्त्रांची खरेदी कराल. जीवलगांचा सहवास लाभेल. मित्रांबरोबर पर्यटनाचा आनंद लाभेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : आर्थिक नियोजन नसल्यामुळे ताणतणाव निर्माण होतील. कामांची गती मंदावेल. आपल्या वस्तूंची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रतिष्ठा पणाला लागेल. आत्मचिंतनाची गरज.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन : आतिथ्यामध्ये दिवस जाईल. आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. प्रसन्‍नता मिळेल. आवडत्या मित्रांचा सहवास लाभेल. नव्या लोकांबरोबर मैत्री होईल.

Back to top button