आजचे राशिभविष्य (दि. ७ जुलै २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ७ जुलै २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. व्यापारी व नोकरदारांसाठी आनंददायी घटना घडेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. संकटकाळी जवळचे मदतीला येतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- द्विधा मनःस्थिती होईल. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. मनाविरुद्ध गोष्टी घडतील. अपमानित होण्याचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- निर्णय घेताना सल्ला-मसलत आवश्यक आहे. सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवून कामे करावीत. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. भिती बाळगु नका.
राशिभविष्य
कर्क
कर्क- लेखन वाचनाचे छंद जोपासाल. कामाचे कौतुक होईल. आप्तेष्टांच्या सहकार्याने कार्यसिद्धी होईल. धनप्राप्तीचे योग. क्रीडा विषयात प्रावीण्य मिळवाल.
राशिभविष्य
सिंह
सिंह- वाणीवर नियंत्रण आवश्यक. मनःस्ताप होण्याची शक्यता. संतुलन महत्त्वाचे. अवास्तव खर्चावर नियंत्रण ठेवा. आपापसातील मतभेद संवादाने सोडवा.
राशिभविष्य
कन्या
कन्या- आनंददायी घटना घडतील. कार्यनिश्चिती होईल. आदर-सत्कार होतील. मित्रमंडळींच्या सहकार्य लाभेल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
तुळ
तूळ- गैरसमजातून वादविवादचे प्रसंग निर्माण होतील. आळस अपयशाकडे घेऊन जाईल. कार्यतत्परता आवश्यक आहे. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक- वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आर्थिकद़ृष्ट्या प्रगतीपथावर राहाल.
राशिभविष्य
धनु
धनु- आशा-आकांक्षा पूर्ण होतील. पदोन्नतीचे योग. गृहसौख्य उत्तम राहील. वादविवादात यश मिळेल. मनासारख्या घटना आत्मबल वाढवतील. कौतुक होईल.
राशिभविष्य
मकर
मकर- दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. तीर्थक्षेत्री जाण्याचे प्रसंग येतील. सातत्य आणि संयमाची गरज.
कुंभ -
कुंभ
कुंभ- नकारात्मक द़ृष्टिकोन त्रासदायक ठरेल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. थकवा, अशक्तपणा जाणवेल. योग साधनेची गरज. सल्ला देऊ नका.
राशिभविष्य
मीन
मीन- गृहसौख्य उत्तम राहील. सौख्यकारक घटना घडतील. प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. भागीदारीत लाभ होतील.

– पं. प्रसाद जोशी

Back to top button