आजचे राशिभविष्य (दि. 1 जून 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 1 जून 2022)

राशिभविष्य
मेष

मेष- व्यापारवृद्धी होईल. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. लेखन, वाचनामुळे आर्थिक विकास संभवतो. साहस कामी येईल. अचूक निर्णय घ्याल.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ- ‘मी’पणा त्रासदायक ठरू शकतो. माहितीची शहानिशा आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका, आर्थिक नुकसान सहन करावे लागेल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन- हजरजबाबीपणामुळे विषय संपुष्टात येतील. जाईल. कामातील शिस्तबद्धतेचे कौतुक होईल. मनासारखी खरेदी कराल. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
कर्क

कर्क- आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. दिलेला शब्द पाळताना तारेवरची कसरत होईल. मनःस्ताप देणार्‍या घटना घडतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
सिंह

सिंह – कामे यशस्वी होतील. नव्या संधी चालून येतील. छोटे प्रवास आनंद देऊन जातील. विवाहविषयक सुवार्ता ऐकावयास मिळेल. मित्रमंडळींची भेट होईल.
राशिभविष्य
कन्या

कन्या-लोकहितासंबंधित कामांमध्ये आपले सहकार्य मोलाचे ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
तुळ

तूळ – आरोप-प्रत्यारोपांचा सामना करावा लागेल. अनावश्यक खर्च होतील. आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. सरकारी कामे रखडतील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक – प्रॉपर्टीसंबंधित जुनी प्रकरणे समोर येतील. सरकार दप्तरी उत्तर द्यावे लागेल. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. सल्ला-मसलत करून निर्णय घ्याल.
राशिभविष्य
धनु

धनु – वरिष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. उपाययोजना लाभदायक ठरतील. जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील. प्रवासाचे बेत आखाल.
राशिभविष्य
मकर

मकर – आशा-अपेक्षा पूर्ण करणारा दिवस. बदलीचे योग. आर्थिक लाभ होतील. नोकरीत जवळच्या व हाताखालच्या लोकांचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ -घाईने घेतलेल्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक गोष्टींवर खर्च होईल. प्रेम प्रकरणात अपयश येईल. वादापासून दूर राहा.
राशिभविष्य
मीन

मीन- संधी निघून जातील. वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक कलहामुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. जमिनीसंबंधित वाद निर्माण होतील.

Back to top button