Baldnes : पुरुषांना टक्कल का पडतं? | पुढारी

Baldnes : पुरुषांना टक्कल का पडतं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बाला’, ‘उजडा चमन’ आणि ‘हाऊसफुल-4’, या चित्रपटांतून पुरुषांचं टक्कल (Baldnes) हा विषय प्रामुख्यानं मांडला गेला. पण, महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या डोक्यावर टक्कल पडण्याचे कारण काय आहे? याचं कारण कधी जाणून घेतलं आहे का… नाही ना? चला तर जाणून घेऊ…

एका अभ्यासानुसार ७० टक्के पुरूष आपल्या जीवनात केस गळण्याच्या समस्येला किंवा टक्कल पडल्याच्या समस्येला वैतागलेले असतात. तर, महिल्यांमध्ये हेच प्रमाण ४० टक्क्यांवर आहे.

पुरुषांमध्ये टक्कल (Baldnes) पडण्यामध्ये एंड्रोजेनिक एलोपेसिया किंवा पॅटर्न बाेल्डनेस, असंही म्हंटलं जातं. त्यामुळे पुरुषांच्या डोक्याच्या समोरच्या भागापासून केस गळती सुरू होते. त्यानंतर डोक्याच्या वरच्या बाजूने केस झडण्यास सुरु होते.

पुरुषांना टक्कल पडण्यामागचं मोठं कारण म्हणजे पुरुषांच्या शरीरात जेनेटिक्स आणि डी-हायड्रो टेस्टोस्टेरोन नावाचे हाॅर्मोन्स असतात. वयात येताना पुरूषांचे स्नायू आणि डोक्यातील पेशी स्ट्रेच होत असतात.

दरम्यान, हायड्रो टेस्टोस्टेरोन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होते. आपल्या केसांमध्ये फाॅलिकल्स (ग्रंथी) असतात. त्यामध्ये पुन्हा केसांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असणारे ऐंड्रोजन रिसेप्टर्स शरीराकडून पोषक तत्वे शोषून घेत असतात. पण, हायड्रो टेस्टोस्टेरोन वाढल्यामुळे हाॅर्मोन्सला जास्त शोषून घेतात.

त्यामुळे शरीरात डोक्याच्या ग्रंथीमध्ये (फाॅलिकल्स) आखडतात आणि पोषक तत्वे घेण्याचं प्रमाण कमी होतं. त्या ग्रंथी कमजोर होऊ लागतात. त्यातूनच पुरुषांच्या डोक्यांवरील केस गळण्यास सुरूवात होते.

हाॅर्मोन्सने आपलं बस्तान बसविल्यामुले डोक्यावर केस टिकत नाहीत. हेच हाॅर्मोनम्स डोक्याच्या ग्रंथी जागाही बळकवते. असे हाॅर्मोन्स तयार होण्याची प्रक्रिया सुरूच असते. परिणामी, पुरुषांना कायम स्वरूपी टक्कल पडते.

काही पुरुषांना टक्कल पडत नाही किंवा केस गळण्याची समस्या नाही. त्याची दोन प्रमुख कारणे आहे. एक तर, त्या पुरुषांकडे अनुवंशिकतेमध्ये टक्कल नसते. दुसरं कारण असं की, ऐंड्रोजन रिसेप्टर्स हाॅर्मोन्सला कमी प्रमाणात शोषून घेते.

पहा व्हिडीओ : कोरोना आणि आरोग्य 

Back to top button