International Dog Day : होय, तुमच्या लाडक्या कुत्र्याला डायबेटिज होऊ शकतो | पुढारी

International Dog Day : होय, तुमच्या लाडक्या कुत्र्याला डायबेटिज होऊ शकतो

पुढारी ऑनलाईन डेस्क : International Dog Day : मधुमेह किंवा डायबेटिज हा माणसांना होणारा आजार कुत्र्यांनाही होऊ शकतो, हे जर सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही. पण, ही वस्तुस्थिती आहे. कुत्र्यांचं खाद्य आणि व्यायाम यात दुलर्क्ष झालं आणि त्याचबरोबर इतर काही कारणांमुळे तुमच्या लाडक्या कुत्र्याला डायबेटिज (Diabetes dog) होऊ शकतो. International Dog Day निमित्त जाणून घेउ या कुत्र्यांना हाेणार्‍या डायबेटिज बद्‍दल…

वय, स्थुलता, स्वादुपिंडाला नेहमी सूज येणं, काही स्टेरॉईडची औषध, शरीरात स्टेरॉईडची जास्त निर्मिती, अनुवांशिकता, अशा काही कारणांमुळे कुत्र्यांत हा आजार होऊ शकतो. सर्वसाधारणपणे मादी कुत्र्यांत हा धोका जास्त असतो.

Insulin-deficiency diabetes आणि Insulin-resistance diabetes असे दोन प्रकारचे डायबेटिज कुत्र्यांत (Diabetes dog) दिसून येतात. यातील Insulin-deficiency diabetes या आजार जास्त प्रमाणात दिसणारा आजार आहे.

शरीरात योग्य प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती नाही झाली, तर Insulin-deficiency diabetes हा आजार होतो. Insulin-resistance diabetes या प्रकारात स्वादुपिंडात इन्सुलिनची निर्मिती होते. पण, कुत्र्याच्या शरीराकडून याचा वापर होऊ शकत नाही. या प्रकारचा डायबेटिज स्थुल आणि वयस्कर कुत्र्यांत जास्त दिसून येतो.

Diabetes dog
होय, तुमच्या लाडक्या कुत्र्याला डायबेटिज होऊ शकतो

लक्षण काय आहेत?

कुत्र्याला सतत तहान लागणे, सतत लघवीला होणे, पुरेसं आहार असतानाही वजन कमी होणं, भूक लागणे अशी लक्षणं डायबेटिज झालेल्या कुत्र्यांत दिसतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसत असतील, तातडीने प्राण्यांच्या डॉक्टराशी संपर्क साधावा.

कुत्र्यांना जर डायबेटिज झाला असेल तर, जितक्या लवकर निदान होईल तितके उपचार होणं सोपं जातं. जर डायबेटिस वरच्या टप्प्यात असेल तर अंधत्व, लिव्हरचं काम बिघडणं, मूत्रमार्गात इन्फेक्शन होणं, किडनी फेल होणे असे आजार होऊ शकतो.

कुत्र्याची रक्त आणि लघवी यांची तपासणी करून डॉक्टर डायबेटिजबद्दल निदान करतात. योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि औषध यातून कुत्र्यांना झालेला डायबेटिज नियंत्रणात ठेवता येतो. अर्थात कुत्र्यांमध्ये ही व्याधी होऊच नये यासाठी काळजी घेणं कधीही योग्य!

पहा व्हिडीओ : गायी पाळणाऱ्या मुंग्यांची गोष्ट

या इंटरेस्टिंग स्टोरीज वाचल्यात का?

Back to top button