सोशल मीडिया : मृत्यूनंतर फेसबुक, ट्विटर... अकाऊंट्सचे काय होते?  - पुढारी

सोशल मीडिया : मृत्यूनंतर फेसबुक, ट्विटर... अकाऊंट्सचे काय होते? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका साध्या Black and white मोबाईलपासून 4G-5G च्या स्मार्टफोनपर्यंत आपला प्रवास झाला आहे. त्यातील सोशल मीडियातील विविध प्लॅटफाॅर्म हे खूप महत्वाचे झाले आहे. पण, कधी असा विचार केला आहे का? की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या विविध सोशल मीडिया अकाऊंट्सचे काय होते… पडला ना प्रश्न? चला तर पाहूया… मृत्यूनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब, लिंक्डइन, क्योरा… या अकाऊंटचे काय होते ते…

facebook

फेसबुक आणि इन्स्टाग्राम : जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म म्हणजे फेसबुक आहे. या फेसबुकने मृत लोकांसाठी काही विशेष नियम तयार केलेले आहेत. तुम्ही हवंतर तुमचे फेसबुक अकाऊंट डिलीट करू शकता किंवा आठवणींच्या रुपाने ठेवू शकता. यासाठी संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर फेसबुक अकाऊंटमधील नावाच्या बरोबर बाजूला ‘रिमेंबर’ असा पर्याय दाखवते. त्याशिवाय फेसबुकला लीगर काॅन्ट्रॅक्ट पाठवावे लागेल, ज्यात तुम्हाला सांगावं लागेल की, मृत्यूनंतर तुमचं फेसबुक अकाऊंट कोण हॅण्डल करणार आहे. त्यानंतर तुम्हाला फेसबुक तुमच्याशी एक काॅन्ट्रॅक्ट करेल, त्यातील सर्व नियमांचे पालन करावे लागेल. हीच पाॅलिसी इन्स्टाग्रामसाठीदेखील आहे.

youtube

यूट्यूब ः विविध गाणी, चित्रपटं किंवा इतर मनोरंजक स्टोरी पाहायचं झाल्यास यूट्यूब सर्वात पाॅप्युलर प्लॅटफाॅर्म आहे. अनेक क्रिएटिव्ह काॅन्टेट यूट्यूबवर टाकणारे यूजर्सदेखील आहेत. एक व्यावसायिक दृष्टीने यूट्यूबकडे सर्वजण पाहतात. समजा यूट्यूब अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला, संबंधित व्यक्तीतर्फे यूट्यूबला लीगल काॅन्ट्रॅक्ट पाठवावे लागतो, ज्यामध्ये संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे यूट्यूब अकाऊंट कोण हॅण्डल करणार आहे. जर तुम्ही असे केले नाहीतर, एका विशिष्ठ कालावधीनंतर यूट्यूब अकाऊंटचा वापर न केल्यामुळे बंद केले जाते.

twitter

ट्विटर ः संबंधित ट्विटर वापरकर्त्याच्या मृत्यूनंतर अकाऊंट हॅण्डल करण्यासाठी कोणतीही पाॅलिसी नाही. संबधित व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने ट्विटरकडे अकाऊंट डिलीट करण्याची रिक्वेस्ट पाठवू शकते. त्यानंतर संबंधित वापरकर्त्याच्या ट्विटरवरून फोटो, पोस्ट आणि अकाऊंट डिलीट करते. परंतु, यासाठी ट्विटरकडे मृत्यूचे प्रमाणपत्र द्यावे लागते.

quora

क्योरा ः कोणत्याही प्रश्नाचे सहज उत्तर मिळविण्यासाठी क्योरा हा सोशल मीडियाचा सर्वात बेस्ट प्लॅटफाॅर्म आहे. क्योराचा संबंधित वापरकर्त्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या प्रोफाईलला मेमोरियर पेजमध्ये रुपांतरीत करण्याची क्योराची पाॅलिसी आहे. मात्र, त्यासाठी मृत्यूचे प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे.

थोडक्यात काय तर, जोपर्यंत फेसबुकला मृत्यूची बाब कळवली जात नाही, तोपर्यंत फेसबुक अकाऊंट सक्रीय राहते. लिंक्डइनमध्येदेखील मृत्यूची सूचना दिली जात नाही तोपर्यंत अकाऊंट बंद होत नाही. पिनट्रस्ट अकाऊंटदेखील बंद केले जाऊ शकत नाही. मात्र, ट्विटर अकाऊंट ६ महिने बंद असेल तर ट्विटरकडून अकाऊंट बंद केले जाते. गुगल कंपनीला जोपर्यंत तुमच्या मृत्यूची बातमी पोहोचवली जात नाही, तोपर्यंत ते चालूच राहते.

पहा व्हिडीओ : ब्रा आणि बुब्जवर मी बोलले कारण…

हे वाचलंत का?

Back to top button