आजचे राशी भविष्य (शुक्रवार, दि. ३० जुलै) - पुढारी

आजचे राशी भविष्य (शुक्रवार, दि. ३० जुलै)

मेष– अनावश्यक खरेदी होईल, कर्जदार तगादा लावतील, सरकारी नियमांचे पालन आवश्यक आहे.
वृषभ– लोकांचा आपल्यावरील विश्वास दृढ होईल, समाधान लाभेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
मिथुन– कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल, वरिष्ठांची मर्जी राखाल, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल.
कर्क– मनाविरुद्ध घटना घडतील, नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील.
सिंह– आत्मचिंतनाची गरज आहे, त्याच त्याच चुका परत होतील, अस्वस्थता राहील.
कन्या– आर्थिक नियोजन कराल, कुटुंबीयांची काळजी घ्याल, सामंजस्याने प्रश्न सुटतील.
तूळ– मातुल घराण्याची मदत होईल, शत्रूंवर मात कराल, योग्य दिशेने वाटचाल कराल.
वृश्चिक– असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप, विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक, वादविवादापासून दूर राहावे.
धनु– जमिनीसंबंधित कामे रखडतील, मनाविरुद्ध घटना घडतील, वाहने जपून चालवावीत, व्यवहारामध्ये सावधानता बाळगा.
मकर– आरोग्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील, लाभदायक दिवस ठरेल.
कुंभ– वात-पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे, योग्य आहार व झोपेची गरज, ताणतणावापासून दूर राहावे.
मीन– आप्तेष्टांना मदत कराल, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, प्रसन्नता लाभेल, आर्थिक प्रगती होईल.

Back to top button