आजचे राशी भविष्य (बुधवार; दि.२८ जुलै) - पुढारी

आजचे राशी भविष्य (बुधवार; दि.२८ जुलै)

मेष-कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. व्यावहारिक सावधानता गरजेची. जामीन राहू नका.
वृषभ-व्यवसायानिमित्ताने प्रवास करावे लागतील. आर्थिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. सर्वप्रकारचे लाभ संभवतात.
मिथुन-सुवार्ता ऐकायला मिळेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. सुखकारक दिवस ठरेल.
कर्क-अकारण भीती बाळगाल. पित्ताचे विकार होण्याची संभावना. कामांना महत्त्व द्या.
सिंह-आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. मनोबल वाढवणे गरजेचेे.
कन्या-अलंकार, वस्त्र खरेदी होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जोडीदाराची साथ लाभेल.
तूळ– नोकरी, व्यवसायामध्ये लाभ होतील. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळेल.
वृश्‍चिक-ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी. नावलौकिकाला धक्‍का लागू देऊ नका. कामांचा वेग मंदावेल.
धनु-मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. कौटुंबिक ताणतणाव निर्माण होतील, सामंजस्याने प्रश्‍न सोडवावे.
मकर-मनासारख्या घटना घडतील. व्यापार-उद्योगधंद्यामध्ये नावलौकिक मिळेल. नव्या ओळखी होतील.
कुंभ-अनावश्यक खर्च करण्याची सवय अंगलट येण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांकडून योग्य व अचूक मार्गदर्शन घेण्याची गरज आहे.
मीन-संपूर्ण दिवस स्वतःसाठी द्याल. आनंददायी घटना घडतील. आप्‍तेष्टांच्या संवादाने मन प्रसन्‍न होईल. आत्मविश्‍वास वाढेल.

Back to top button