राशिभविष्य (दि. १४ फेब्रुवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. १४ फेब्रुवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : कौटुंबिक प्रश्न सोडवण्यामध्ये दिवस जाईल. पश्चाताप करण्याची वेळ येईल. पोटासंबंधित तक्रारी संभवतात. अनावश्यक खर्च होईल.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : प्रयत्नांना यश मिळेल. आत्मविश्वास निर्माण होईल. नवे धोरण आखाल. नव्या संधी चालून येतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रगतिकारक दिवस.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : मनामध्ये विकल्प निर्माण होतील. वादविवादापासून दूर राहावे. आत्मचिंतनाची गरज आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कर्क

कर्क : सुवार्ता कानावर येईल. वस्त्र, अलंकार खरेदीचे योग. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. मित्रमंडळींबरोबर सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
सिंह

सिंह : ईर्ष्या निर्माण होईल. जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता. परावलंबी स्वभावामुळे मनःस्ताप होईल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : पती-पत्नींमधील वाद मिटतील. व्यावहारिक संतुलन साधाल. व्यावसायिक भरभराट होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
राशिभविष्य
तुळ

तुळ : कुटुंबात आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल. कामांची जबाबदारी वाढेल. मान-सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : द्विधा मनःस्थिती होईल. दवाखान्यासाठी खर्च होण्याची शक्यता. कर थकल्यामुळे अडचणी निर्माण होतील. श्वसनासंबंधित आजार होण्याची शक्यता.
राशिभविष्य
धनु

धनु : आरोप-प्रत्यारोप होतील. मानहानीचे प्रसंग येतील. जुने आजार उद्भवतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
राशिभविष्य
मकर

मकर : प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्याल. जोडीदाराची साथ लाभेल. मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : मनोइच्छित सर्व गोष्टी पूर्ण होण्याचा दिवस. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल. सहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
मीन

मीन : मनःस्ताप होण्याची शक्यता. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. संयमाने वागावे लागेल.

राशिभविष्य

Back to top button