संपूर्ण कुटुंबाचे पीवीसी आधार कार्ड काढता येणार एकाच मोबाईल नंबर वरून.. जाणून घ्या प्रोसेस | पुढारी

संपूर्ण कुटुंबाचे पीवीसी आधार कार्ड काढता येणार एकाच मोबाईल नंबर वरून.. जाणून घ्या प्रोसेस

पुणे: पुढारी वृत्तसेवा:

आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी सक्तीचे करण्यात आले आहे. सरकारी योजना आणि बॅंकींगच्या सुविधासांठी आधार कार्ड बंधनकारक आहे. आधार कार्डशी आपली वैयक्तिक माहिती संलग्न असल्याने आधार कार्ड सुरक्षित असणे गरजेचे आहे. यासाठीच यूआयडीएआय ने आधार चे पीवीसी आधार हे नविन व्हर्जन सादर केले आहे. हे कार्ड आकाराने लहान असल्याने जवळ बाळगणे सोपे होईल.

CISF Constable Recruitment : १२ वी पास उमेदवारांना संधी, सीआयएसएफमध्ये ११४९ पदांसाठी भरती

पीवीसी आधार कार्ड म्हणजे काय?

या आधी प्रत्येक पीवीसी आधार कार्डसाठी स्वतंत्र मोबाईल नंबर आवश्यक होता. परंतु आता एकाच मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटुंबाचे पीवीसी आधार कार्ड व्हेरिफिकेशन करता येणार आहे. प्लास्टिकचे असलेले हे कार्ड आकाराने साधारण एटीएम कार्ड एवढे असून त्यावर आधार नंबर, क्यूआर कोड आणि वैयक्तिक माहिती असणार आहे. पीवीसी आधार कार्ड बनविण्यासाठी प्रत्येकी ५० रूपये शुल्क द्यावे लागेल, अशी माहिती यूआयडीएआय ने ट्विटरद्वारे दिली

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; १ फेब्रुवारीला प्रारूप आराखडा प्रसिद्ध होणार

असे करा अप्लाय

– यूआयडीएआय च्या uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in या वेबसाइटवर तुमचा आधार कार्ड नंबर, व्हर्चुअल आईडी नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
– ऑनलाईन पेमेंटद्वारे ५० रूपये शुल्क भरा. त्यानंतर काही दिवसात हे कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहचवण्यात येईल.

मास्क वापरणं बंधनकारक, मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली नाही : अजित पवार

मोबाईल नंबर लिंक नसेल तर असे करा अप्लाय

– सर्वप्रथम https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint या लिंक वर लॉगिन करून तुमचा आधार कार्ड नंबर रजिस्टर करा.
– सिक्यूरिटी कोड टाकून एंटर करा आणि मोबाईल नंबर नॉट रजिस्टर या ऑप्शन वर क्लिक करा.
– यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका.
– ऑनलाईन पेमेंटद्वारे ५०रूपये शुल्क भरा आणि काही दिवसात हे कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहचवण्यात येईल.

Back to top button