राशिभविष्य (दि. २८ जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. २८ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. जुने आजार उद्भवतील. प्राणायाम, योगसाधना गरजेची आहे. संयमाने विषय हाताळावे लागतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : जोडीदाराची साथ लाभेल. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : नोकदारांसाठी लाभदायक दिवस. वाद-विवादात जय प्राप्त कराल. आर्थिक प्रगती होईल. आप्त-स्वकीयांच्या मदतीने कार्यसिद्धी होईल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. एकाग्रचित्ताने कामे करा. विद्यार्थ्यांनी आळस न करता अभ्यास करावा.

सिंह

 

 

 

 

सिंह : आर्थिक नियोजन नसल्यामुळे ताणतणाव निर्माण होतील. कौटुंबिक कलह टाळा. वाहन विषयक अडचणींचा सामना करावा लागेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : आत्मविश्वासाने काम कराल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. धनप्राप्तीचे योग संभवतात. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस ठरेल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. परस्परांमधील संवाद महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक : नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. अतिथ्यात दिवस जाईल मनासारख्या खरेदीचे योग. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता राहील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : ईर्ष्या, स्पर्धा यामुळे अस्वस्थता राहील. नम्रता, सहनशीलता आवश्यक आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : आनंददायी घटना घडतील. प्रसन्नता लाभेल. नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल. उत्साह द्विगुणीत होईल. प्रयत्नांना यश मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : अनपेक्षित लाभ होतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. सामाजिक व सांस्कृतिक विषयात मोलाची कामगिरी कराल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : अतिविचारांमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल. कृतीवर भर दिला पाहिजे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल, सत्य स्वीकारून पुढे जावे.

Back to top button