राशिभविष्य (दि.२७ जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि.२७ जानेवारी २०२२)

मेष- धार्मिक कार्यक्रमामधे सहभाग घ्याल, जुने आजार उद्भवतील, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, नियमांचे उल्लंघन नको, संयम आवश्यक आहे.

वृषभ- उष्णतेचे विकार होण्याची संभावना आहे. जुन्या प्रॉपर्टी संदर्भात माहिती मिळेल, वाद-विवादापासुन दूर रहा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घ्यावा.

मिथुन- अथक् प्रयत्नांना यश मिळेल, प्रेम-प्रकरणांमधे यश मिळेल, सरकार संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतिल, भागीदारी तील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल.

कर्क- आज उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिध्दी, यशाकडे वाटचाल, नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

सिंह- नवी दिशा व धोरणांचा स्विकार करावा लागेल, आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

कन्या- कौटुंबिक वातावरण बिघडेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, पित्ताचे विकार होण्याची संभावना.

तूळ- भावंडांकडून सहकार्य लाभेल, आर्थिक प्रगती होईल मित्रमंडळींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस, कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक- अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासुन लांब रहा.

धनु- महत्वाकांक्षी स्वभावामुळे कामांमधे यश मिळेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी उपलब्ध होईल, आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल.

मकर- आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस आत्मविश्वास दृड ठेवणे आवश्यक आहे, वस्तु हरवण्याची शक्यता आहे, संयमित रहाणे महत्वाचे आहे

कुंभ – अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल,व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग संभवतात

मीन – ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल सामाजिक कार्यामधे सहभाग घ्याल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहिल, उत्तम आरोग्य.

Back to top button